होमग्राऊंडवरचा पराभव शिवसेनेला झोंबला, तृप्ती सावंत यांना पोलीस सुरक्षा देण्याची वेळ

होमग्राऊंडवरचा पराभव शिवसेनेला झोंबला, तृप्ती सावंत यांना पोलीस सुरक्षा देण्याची वेळ

या मतदारसंघातून सेनेच्या तृप्ती सावंत इच्छुक होत्या. पण महाडेश्वरांना तिकीट मिळाल्याने तृप्ती यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : शिवसेनाप्रमुखांचं निवासस्थान ज्या विधानसभा मतदारसंघात येतं, तिथूनच सेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वांद्रे पूर्व या मतदारसंघातून पराभव झाला आहे. काँग्रेसच्या झिशांत सिद्दीकी यांनी त्यांचा पराभव केला. तर या सगळ्या पराभवाचं खापर हे शिवसेना बंडखोर तृत्पी सावंत यांच्यावर फोडण्यात आलं आहे. या पराभवाचा संताप म्हणून तृत्पी सावंत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. तृत्पी सावंत यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या पराभवाला सेनेतलीच बंडखोरी जबाबदार असल्याचं स्पष्ट होत आहे. या मतदारसंघातून सेनेच्या तृप्ती सावंत इच्छुक होत्या. पण महाडेश्वरांना तिकीट मिळाल्याने तृप्ती यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अगदी 2 दिवस आधीच शिवसेनेनं तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी केली. या सगळ्याचा फटका सेनेला बसला आणि अंगणातच त्यांचा पराभव झाला. झिशांत सिद्दीकी यांनी त्यांचा पराभव केला.

इतर बातम्या - मंडळी! 1 लाख 63 हजार 176 ही फक्त एकूण मतं नाहीत, तर लीड आहे लीड

पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे तृत्पी सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं सेनेनं सांगितलं. मुंबईच्या वांद्रे पूर्व विभागातून तृप्ती सावंत यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं सामानाच्या मुखपत्रातून जाहीर करण्यात आलं. तृप्ती सावंत यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि निकटवर्तीयांमध्ये नाराजीचा सूर होता.

इतर बातम्या  - Parli Election Result 2019: पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

तृप्ती सावंत या दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी असून त्या विद्यमान आमदार होत्या. 2015 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये तृप्ती यांनी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. पण यंदा त्यांना उमेदवारी नाकरण्यात आली. आपला पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारला असल्याचं महाडेश्वर म्हणाले. "जनतेचा कौल मी मान्य करेन आणि का हरलो याची मीमांसा करेन", असं ते म्हणाले.

इतर बातम्या - निवडणुकीत एकच दादा, अजित पवार रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी

Published by: Renuka Dhaybar
First published: October 24, 2019, 2:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading