'दोन' धक्कादायक पराभवांवर मुख्यमंत्री पहिल्यांदाच बोलले, दिलं हे कारण!

बंडखोरीच्या फटक्यामुळे काही जागा हातच्या गेल्या. दोन्ही पक्षांचं नुकसान झालं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 05:10 PM IST

'दोन' धक्कादायक पराभवांवर मुख्यमंत्री पहिल्यांदाच बोलले, दिलं हे कारण!

मुंबई, 24 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकांचा निकांचा कल समोर येत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. परळीतून पंकजा मुंडे आणि सातारा पोटनिवडणुकांमध्ये उदयनराजे भोसले यांचा पराभव हा भाजपसाठी सगळ्यात मोठा धक्का असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. या पराभवाचं आम्ही विश्लेषण करू असंही ते म्हणाले. दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी खडसेंविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतले मुद्दे

- निकालांचे कल हाती आल्यानंतर पहिल्यांदाच बोलले मुख्यमंत्री

- भाजपसाठी 2 निकाल धक्कादायक. पंकजा मुंडे आणि उदयन राजे यांच्या पराभवाचं विश्लेषण करू

- गेल्या निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं. जागा कमी-जास्त झाल्या असल्या तरी आमचा स्ट्राइक रेट चांगलाच.

Loading...

- जितक्या जागा लढवल्या होत्या त्या तुलनेत यश चांगलं.

- बंडखोरीच्या फटक्यामुळे काही जागा हातच्या गेल्या. दोन्ही पक्षांचं नुकसान.

- स्पष्ट कौल दिल्याबद्दल जनतेला दिले धन्यवाद.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचे आभार मानले. मात्र आभार मानतानाच भाजपलाही त्यांनी टोले लगावले. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरलेल्या 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्याची आठवणही करून दिली. दोनही पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्र बसतील. पारदर्शकपणे चर्चा करतील आणि तोडगा काढतील असंही त्यांनी सांगितलं. आधी सत्तेचं वाटप ठरेल नंतरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा भाजपला इशारा नसून लोकसभेच्या वेळी जे ठरलं त्याची फक्त आठवण करून देतो असंही ते म्हणाले.

इतर बातम्या - निकालांचं वार फिरलं, या बड्या नेत्यांची मुलं पहिल्यांदाच विजयी!

उद्धव ठाकरे म्हणाले, कुणाही एका व्यक्ती किंवा पक्षाभोवती प्रचार केंद्रीत राहू नये. जनतेनं अत्यंत जागरूकपणे मतदान केलंय. त्यांनी विरोधी पक्ष जिवंत ठेवलाय. काही जण गृहीत धरून चालतात त्यांनाही जनतेनं योग्य तो संदेश दिलाय असा टोलाही त्यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लगावला. सत्ता स्थापनेही मला घाई नाही असंही त्यांनी सांगितलंय. भाजपने जागावाटपावेळी अडचण आहे म्हणून सांगितलं. मात्र प्रत्येकवेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले. गरज पडली तर अमित शहाही चर्चेला येतील असंही ते म्हणाले.

इतर बातम्या - होमग्राऊंडवरचा पराभव शिवसेनेला झोंबला, तृप्ती सावंत यांना पोलीस सुरक्षा!

आदित्य ठाकरेंचा दणदणीत विजय

युवासेना अध्यक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. आदित्य ठाकरे यांना 70 हजार 191 मतांनी विजय झाला आहे. येथे आदित्य ठाकरे आणि आघाडीचे उमेदवार सुरेश माने यांच्यात प्रमुख लढत होती. तर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील वादग्रस्त स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनीही थेट आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. दरम्यान, सुरेश माने यांना 15296 मतं तर बिचुकले यांना 647 मतं मिळाली आहेत.

इतर बातम्या - मंडळी! 1 लाख 63 हजार 176 ही फक्त एकूण मतं नाहीत, तर लीड आहे लीड

निवडणुकीदरम्यान मुंबईतील वरळी मतदारसंघाची प्रचंड चर्चा होती. कारण, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरली. कारण 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरे कुटुंबातील कोणताही सदस्य कधीही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नव्हता. यानिमित्तानं निवडणूक लढवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिलेच सदस्य ठरलेत. आदित्य ठाकरे निवडणूक लढवत असल्याच्या घोषणेमुळे एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे आघाडी येथे आपला सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं जवळपास निश्चितच झालं होतं.

इतर बातम्या  - Parli Election Result 2019: पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2019 05:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...