विकासदराचा 7.5 हा आकडा आला कुठून? राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर विरोधकांचा संशय

विकासदराचा 7.5 हा आकडा आला कुठून? राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर विरोधकांचा संशय

कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रात घसरण होण्याची शक्यता असतानाही राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा मुनगंटीवार यांनी दिला. या सगळ्यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली असं म्हणायला हरकत नाही.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 17 जून : सोमवारी विधिमंडळात राज्याचा 218-19चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. येत्या पाच वर्षात राज्याची अर्थव्यवस्था 1 लाख कोटींची करण्याची भाषा  राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केली असली तरी आर्थिक पाहणी अहवालाचे आकडे वेगळीच कहाणी सांगतायेत. गेल्या आर्थिक पाहणी अहवालाप्रमाणेच  यंदाचा आर्थिक विकास दर 7.5 सांगितला गेला आहे. त्यामुळे कृषी आणि उद्योगक्षेत्रातील घट सरकारची झोप उडणारी आहे.

आर्थिक पाहणी अहवालामुळे सरकारचं पितळं उघडं

- कृषीच्या विकास दरात 2.8 टक्क्यांची घट अपेक्षित असल्याचं आर्थिक पाहाणी अहवालातून समोर आलं आहे.

- 2018-1019 या आर्थिक वर्षात राज्याचा कृषी दर 0.4 टक्के असण्याचं पुर्वानुमान आहे.

- विशेष म्हणजे 2017- 2018 या आर्थिक वर्षात हा दर 3.1 टक्के  होता.

- उद्योग क्षेत्राचाही विकास दर 0.7 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

- खरंतर 2017- 2018 या आर्थिक वर्षात हा दर 7.6  टक्के होता.

- 2018-1019साठी हा दर 6.9 टक्के अपेक्षीत आहे.

- सेवा क्षेत्रात 1.1 टक्के वाढ घट अपेक्षित आहे.

कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रात घसरण होण्याची शक्यता असतानाही राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा मुनगंटीवार यांनी दिला. या सगळ्यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत हा मुद्दा चांगला लावून धरला.

आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी तपासून पाहण्यासाठी दोन्ही सभागृहातील सर्वपक्षीय सदस्यांची समिती नेमण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आली आहे. तर या आर्थिक पाहणी अहवालात याही वर्षी सिंचनाची आकडेवारी गायब आहे. यावरून मुंडेंनी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच एक देश एक निवडणूक अमलात आणण्याचा सरकारचा हेतू आहे, पण हे कठीण आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

आर्थिक पाहणी अहवालात सिंचनक्षेत्राचा समावेश नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आहे. राज्याच्या विकासाचा दावा भलेही राज्य सरकारकडून केला जात असला तरी आर्थिक पाहाणी अहवालातील आकडेवारी सरकारच्या डोळ्यात अंजण घालणारी आहे.

VIDEO : सिंचनाची आकडेवारी गेली कुठे? धनंजय मुंडेंचा थेट सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 05:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading