राज्यात 24 तासांत नवे 352 रुग्ण, 11 जणांचा मृत्यू; एकूण बाधितांची संख्या 2334 वर

राज्यात 24 तासांत नवे 352 रुग्ण, 11 जणांचा मृत्यू; एकूण बाधितांची संख्या 2334 वर

आतापर्यंत मुंबईत 100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : देशभरात कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही महाराष्ट्रात (Maharshtra) सर्वाधित रुग्ण आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे (Covid - 19) 100 जणांचा मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 352 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज वाढ झालेल्या 352 रुग्णांपैकी 242 रुग्ण हे मुंबईतील आहेत. पुण्यातही गेल्या 24 तासांत 39 रुग्ण आढळले आहेत. राज्यात  कोरोना रूग्णांची संख्या कालपर्यंत 1982 इतकी होती ती आज 352 ने वाढून 2334 पर्यंत पोहोचली आहे.

मुंबई - 242

मालेगाव -14

औरंगाबाद -4

पुणे - 39

पिपंरी चिंचवड -6

नागपूर - 11

ठाणे - 9

वसई विरार - 5

देशाची आकडेवारी पाहिली तर गेल्या 24 तासांमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला. ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. तर कोरोना रुग्णांची सख्या 9352 वर पोहोचली आहे तर मृत्यूची संख्या 324 वर गेली आहे. 8048 रुग्ण उपचार घेत असून 979 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यात 72 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

संबंधित -

धक्कादायक! मुंबईतील 7 पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईत कोरोनाबळी 100; बाधितांचा आकडा गेला 1549 वर

कोरोनाचा उद्रेक : 24 तासांमध्ये 51 मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या

First published: April 13, 2020, 9:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading