• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • LIVE: MPSC परीक्षा ही वेळापत्रकानुसार होणार, तारखेत कोणताही बदल नाही!

LIVE: MPSC परीक्षा ही वेळापत्रकानुसार होणार, तारखेत कोणताही बदल नाही!

कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट

 • News18 Lokmat
 • | April 06, 2021, 18:13 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:3 (IST)

  'राज्यात 3 दिवस पुरेल इतकीच लस उपलब्ध'
  केंद्रानं तात्काळ लस उपलब्ध करावी - राजेश टोपे
  'काही रुग्णालयांकडून रेमडिसिवीरचा विनाकारण वापर'
  जास्त दर लावणाऱ्यांवर कारवाई करणार - टोपे
  उद्या सर्व जिल्हा रुग्णालय उपसंचालकांची बैठक
  'रेमडिसिवीर'वर सुधाकर शिंदेंची समिती गठित
  समिती 2 दिवसांत अहवाल सादर करेल - टोपे
  'रेमडिसिवीरचे दर 1400 रुपयांपर्यंत उपलब्ध करू'
  राज्यात बेड उपलब्ध नाही असे नाही - आरोग्यमंत्री
  'काही विशिष्ट रुग्णालयांना हवे ही मागणी चुकीची'

  21:50 (IST)

  सावधान ! राज्यात कोरोनाचा उद्रेक
  राज्यात दिवसभरात 55 हजार 469 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 34,256 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 297 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 82.98, मृत्युदर 1.81%
  राज्यात सध्या 4 लाख 72,283 ॲक्टिव्ह रुग्ण

  21:18 (IST)

  महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी शेजारील राज्यांना केंद्रानं निर्देश द्यावेत; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी

  20:32 (IST)

  पुण्यात दिवसभरात 5,600 नवीन रुग्ण
  पुण्यात दिवसभरात 47 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  पुण्यात दिवसभरात 3481 कोरोनामुक्त

  19:56 (IST)

  सावधान ! मुंबईत कोरोनाचा विळखा
  मुंबईत दिवसभरात 10 हजार 30 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 7019 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू
  मुंबईत आज 740 इमारती केल्या सील

  19:34 (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांसाठी RT-PCR टेस्ट बंधनकारक, सातारा-सांगलीसह राज्यातील इतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या पर्यटकांना, नागरिकांना RT-PCR प्रमाणपत्र बंधनकारक असणार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाईंची माहिती

  19:25 (IST)

  विदेशातून हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी सुधारित सुनिश्चित कार्यपद्धती, तात्काळ प्रभावानं अंमलबजावणी सुरू, सर्व 24 विभाग कार्यालयांच्या हद्दीत विलगीकरणासाठी निर्देशित हॉटेलमध्ये प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पथकांची नियुक्ती, विलगीकरणाशी संबंधित नियम व सूचनांचं उल्‍लंघन करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई

  19:5 (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4638 नवे रुग्ण
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 4191 कोरोनामुक्त
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 32 रुग्णांचा मृत्यू

  19:2 (IST)

  राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या, कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता 31 ऑगस्टपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय; सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा सहकार विभागाचा निर्णय

  18:40 (IST)

  महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि सर्व व्यापारी संघटनांची ऑनलाईन झाली बैठक, सरसकट लॉकडाऊनला तीव्र विरोध, सरकारनं 8 एप्रिलपर्यंत निर्णय घ्यावा, निर्बंध लादून व्यापार सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी

  कोरोना त्याचप्रमाणे राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट