• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • LIVE : सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

LIVE : सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 04, 2021, 15:49 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:30 (IST)

  बॉलिवूड कलाकारांकडून मोठा हलगर्जीपणा
  सोहेल खान, अरबाज खान यांच्यावर FIR
  निर्वाण खानवरही महापालिकेकडून FIR
  खार पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल
  मुंबई विमानतळावरून परस्पर घरी गेल्याचं उघड
  यूएईहून 25 तारखेला विमानतळावर उतरले
  कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी FIR
  7 दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणं आवश्यक होतं

  21:28 (IST)

  पिंपरी-चिंचवडमधील अण्णासाहेब मगर स्टेडियमवर उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरला आग, कोविड सेंटरमध्ये मोठा गोंधळ उडाला होता, पीएमआरडीएच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवलं

  20:18 (IST)

  राज्यासाठी आजचा दिलासादायक दिवस
  राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येत घट
  रुग्ण बरं होण्याच्या प्रमाणातही वाढ
  राज्यात दिवसभरात 29 रुग्णांचा मृत्यू
  राज्यातला कोरोनाचा मृत्युदर 2.55% 
  राज्यात दिवसभरात 2,765 नवीन रुग्ण
  राज्यात 10,362 रुग्णांची कोरोनावर मात
  राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.88%
  सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 48,801

  19:34 (IST)

  'नवे कोरोना रुग्ण आढळल्यानं अधिक दक्षता घ्या'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
  'परदेशातून अन्य राज्यांमार्गे येणारे प्रवासी'
  विलगीकरणाबाबत केंद्राला विनंती करणार -मुख्यमंत्री

  19:3 (IST)
  नाशिक - बापाकडून मुलाची हत्या, मुलानं त्यांच्या प्रेयसीच्या नावावर जमीन करून द्यायला केला विरोध, याचा राग मनात धरून बापानं पोटच्या तरुण मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना, जनरल वैद्यनगर परिसरातील घटनेनं खळबळ, आईच्या फिर्यादीवरून आरोपी प्रभाकर माळवाडला अटक
   
  18:50 (IST)

  ब्रिटनमधून महाराष्ट्रात परतलेल्या 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणं
  मुंबई 5, पुणे, ठाणे, मीरा-भाईंदरमधील प्रत्येकी 1 जण
  'हे सर्वजण विलगीकरणात, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू'
  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

  18:42 (IST)

  मुंबई - वर्षा राऊतांची ईडी चौकशी संपली
  ईडी कार्यालयात साडेतीन तास चौकशी
  पीएमसी बँक प्रकरणात केली चौकशी
  वर्षा राऊतांची ईडीकडून कसून चौकशी
  वर्षा राऊत ईडी कार्यालयातून बाहेर

  18:38 (IST)

  एमपीएससीकडून SEBC प्रवर्ग तूर्तास रद्द
  2020 मध्ये SEBC प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांना
  EWS/खुल्या प्रवर्गाचा पर्याय निवडावा लागणार
  ऑनलाईन अर्जाची लिंक राहणार खुली
  5 ते 15 जाने. 2021 या काळात खुली राहणार
  वर्षभरात MPSCनं 4 परीक्षांसाठी भरलेत अर्ज
  कोरोना, आरक्षण स्थगितीमुळे पूर्वपरीक्षा नाही
  EWS/खुल्या प्रवर्गाच्या पर्याय निश्चितीनंतर
  जाहीर होऊ शकते परीक्षेची नवी तारीख

  18:24 (IST)

  देशवासीयांसाठी मोठी खुशखबर
  'कोव्हॅक्सिन लस लवकरच उपलब्ध होणार'
  भारत बायोटेकचे कृष्णा एल्ला यांचं वक्तव्य

  18:21 (IST)

  'ईडीच्या चौकशीला वर्षा राऊत खंबीर'
  शक्तिप्रदर्शनाची गरज नाही -संजय राऊत
  ईडीनं तपास करावा -संजय राऊत
  'सरकारी कागदाचा मान ठेवला जाईल'
  'आमच्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही'
  आम्ही ईडीला संपूर्ण सहकार्य करू -राऊत

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स