LIVE: उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 28, 2021, 23:29 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:14 (IST)

  कोरोनावरील प्रतिबंधक लसी, औषधं, वैद्यकीय उपकरणं, सेवांवरील जीएसटी करात राज्यांना सवलत मिळावी, केंद्र सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या इंधनावरील विविध उपकर, अधिभारांचं राज्यांना सुयोग्य वाटप व्हावं, कोरोना संकटाचा मुकाबला करण्याबरोबरच राज्याचं अर्थचक्र सावरण्यासाठी केंद्राकडून मदत आणि सकारात्मक सहकार्याची अपेक्षा - अजित पवार

  22:13 (IST)

  43व्या जीएसटी परिषदेत महाराष्ट्राच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यहिताचे मुद्दे मांडत केल्या आग्रही मागण्या, राज्याच्या हिश्श्याची गतवर्षाची जीएसटीची 24 हजार कोटींची भरपाई तातडीनं मिळावी - अजित पवार

  21:57 (IST)

  नागपूर - गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील घटना, लष्करी बाग परिसरात एकाची दगडानं ठेचून हत्या

  20:46 (IST)

  पंढरपूर - वेळापूर पोलिसांवर प्राणघातक हल्ला, अवैध दारूप्रकरणी टाकायला गेले होते धाड, 2 पोलीस गंभीर जखमी तर एकाला किरकोळ दुखापत

  20:27 (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 13764 कोरोना टेस्ट
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 985 नवीन रुग्ण
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 2931 कोरोनामुक्त
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 39 रुग्णांचा मृत्यू

  20:6 (IST)

  कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी टास्क फोर्स आणि विभागानं समन्वयानं काम करावं - मुख्यमंत्री

  19:48 (IST)

  कल्याण - एमआयडीसीची पाईपलाईन फुटली
  कल्याण-शीळ रोड कटाई नाक्याजवळ फुटली
  ठाण्याला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी
  पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी

  19:44 (IST)

  राज्यासाठी सकारात्मक, दिलासादायक बातमी
  राज्यात दिवसभरात 31,671 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 20,740 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 424 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 93.24 तर मृत्युदर 1.64 टक्के
  राज्यात सध्या 2 लाख 89,088 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:6 (IST)

  पुण्यातील कडक वीकेंड लॉकडाऊन अखेर रद्द, सातही दिवस सकाळी 7 ते 11 दरम्यान अत्यावश्यक सुविधा पुरवणारी दुकानं सुरू राहणार

  17:49 (IST)

  मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा
  'आरक्षणासाठी प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या'
  'कुठलाही राजकीय अजेंडा घेऊन आलेलो नाही'
  'राजकीय पक्षाविरोधात आमची लढाई नाही'
  सकल मराठा समाजाला न्याय मिळावा - संभाजीराजे
  'मराठा समाजावरच्या अन्यायाविरोधात माझा लढा'
  आतापर्यंत सामंजस्याची भूमिका घेतली - संभाजीराजे
  'मराठा समाजाला तुमच्या भांडणात स्वारस्य नाही'
  मराठा समाजाला न्याय मिळवून द्या - संभाजीराजे
  आपण समाजाला वेठीस धरू नका - संभाजीराजे
  ही खासदार, आमदारांची जबाबदारी - संभाजीराजे
  'समाजात अस्वस्थता, यापुढे हे चालणार नाही'
  मूळ स्वभाव नसतानाही आक्रमक झालो - संभाजीराजे
  भेटीत 3 पर्याय सर्वांना सांगितले - संभाजीराजे
  पुनर्विचार याचिका दाखल करा - संभाजीराजे
  '...अन्यथा क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करावी'
  जबाबदारी राज्य आणि केंद्राचीही - संभाजीराजे
  खरी परिस्थिती समाजासमोर मांडा - संभाजीराजे
  'वंचितांना आरक्षण मिळावं ही माझी भूमिका'
  गरीब मराठ्यांना न्याय द्या - संभाजीराजे छत्रपती
  सारथी संस्थेची काय अवस्था करून टाकली - राजे
  'योग्य स्वायत्तता दिल्यास आरक्षणापेक्षा महत्वाची ठरेल'
  'तळागाळात समाजासाठी काम केलं त्यांना सारथीत घ्या'
  'सारथी'साठी 1 हजार कोटी मंजूर करा - संभाजीराजे
  दर जिल्ह्यात एक वसतिगृह द्या - संभाजीराजे
  'मराठा समाजासाठी वेगळी समिती स्थापन करा'
  मराठा समाजही वंचित समाजाचा घटक - संभाजीराजे
  'मी महाराष्ट्र शांत केला, अन्यथा पेटला असता'
  '6 जूनला भूमिका घ्या, अन्यथा आमची भूमिका ठरवू'
  रायगडावर पुढची दिशा स्पष्ट करणार - संभाजीराजे
  आता आमदार-खासदारांची जबाबदारी - संभाजीराजे
  '2 दिवसांचं अधिवेशन घेऊन चर्चा झाली पाहिजे'
  आरोप-प्रत्यारोपांसाठी अधिवेशन नको - संभाजीराजे
  दिल्लीत गोलमेज परिषद घेणार - संभाजीराजे
  मराठा समाजाला तुच्छ लेखू नका - संभाजीराजे
  सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आदर करतो - संभाजीराजे
  सर्वांनी आत्मचिंतन करावं - संभाजीराजे छत्रपती
  'राजकीय नुकसान होईल याची कल्पना आहे'
  मी नुसत मराठ्यांचं नेतृत्व करत नाही - संभाजीराजे
  मला बहुजन समाजाचीही चिंता - संभाजीराजे
  'सर्वांनी एकत्र यावं, ही हात जोडून विनंती'
  खासदार संभाजीराजेंचा 6 जूनपर्यंत अल्टिमेटम
  7 जूनला पुढची दिशा ठरवणार - संभाजीराजे
  'बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्ष'
  खासदार संभाजीराजे छत्रपतींचं मोठं वक्तव्य
  'राजीनामा देऊन प्रश्न सुटणार असेल तर आजच देतो'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स