liveLIVE NOW

LIVE: रत्नागिरीतील 5 गावातील डेल्टा प्लसचे रुग्ण झाले बरे, कंन्टेंन्मेंट झोन उठवला

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 28, 2021, 18:40 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 5 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:2 (IST)

  ट्विटरनं आपल्या वेबसाईटवरून नकाशा काढला
  मोठ्या वादानंतर ट्विटरनं चुकीचा नकाशा हटवला
  जम्मू-काश्मीर, लडाखचा भाग वगळला होता
  नकाशावर वेगळा देश म्हणून दाखवला होता

  21:19 (IST)

  मुंबई - मंत्रालयात पुन्हा कोरोनाची एन्ट्री
  माहिती जनसंपर्क कार्यालयात तिघांना लागण
  कार्यालय केलं निर्जंतुक, कर्मचाऱ्यांना लवकर सुट्टी
  तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती

  20:45 (IST)

  राज्यात दिवसभरात 6,727 रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 10,812 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 101 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 96 तर मृत्युदर 2.1 टक्के
  राज्यात सध्या 1 लाख 17,874 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:49 (IST)

  पुणे - आंबिल ओढ्यातील कारवाई प्रकरण, प्रकाश आंबेडकरांनी घेतली रहिवाशांची भेट, पावसाळ्यात कुणालाही बेघर करायचं नाही असे निर्देश असताना कारवाई झाली, मनपा प्रशासनाला अतिक्रमण पाडण्याचा आदेश नव्हता, जून व जुलैमध्ये कारवाई करू नये, असं असताना पोलिसांनी संरक्षण कसं दिलं? संबंधित बिल्डरवर कारवाई व्हावी, अन्यथा पोलीस आयुक्तांविरोधात आम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाणार, मुख्यमंत्र्यांनी या विषयाची दखल घ्यावी - प्रकाश आंबेडकर

  19:12 (IST)

  सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन नियोजन करा, राज्यातील नागरी व औद्योगिक क्षेत्रातील व्यवस्थापनाचा आढावा - मुख्यमंत्री

  18:39 (IST)

  बेळगाव - अथणी तालुक्यातील धक्कादायक घटना
  हळ्याळ गावात 4 सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू

  17:26 (IST)

  राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेते, मंत्र्यांची उद्या बैठक
  प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी होणार बैठक
  अनिल देशमुखांना ईडीचे समन्स, महामंडळाचं वाटप
  राज्याच्या पावसाळी अधिवेशनावर होणार चर्चा

  17:15 (IST)

  शरद पवार आणि संजय राऊतांची झाली बैठक
  'सिल्व्हर ओक'वर पवारांसोबत केली चर्चा
  मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शरद पवारांची भेट
  काहीही घडामोडी घडत नाहीत - संजय राऊत
  'सीएमचा निरोप असेल तर तुम्हाला कशाला सांगू'
  मी पवार साहेबांनाच सांगेन - संजय राऊत
  राजकीय चर्चा झाली नाही - संजय राऊत
  'आपण कालच पवार साहेबांचं म्हणणं ऐकलंय'
  मविआ सरकार 5 वर्षं पूर्ण करेल - संजय राऊत
  उद्धव ठाकरे उत्तम काम करतायत - संजय राऊत

  16:38 (IST)

  शिवसेना नेते संजय राऊत 'सिल्व्हर ओक'वर
  मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राऊत पवारांच्या भेटीला
  लागोपाठ 2 बैठकांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

  16:25 (IST)

  महाविकास आघाडीत संभ्रमावस्था नाही - राऊत
  'सरकार अस्थिर होईल या भ्रमात कोणी राहू नये'
  महाविकास आघाडीत सर्व आलबेल - संजय राऊत
  मविआ नेत्यांमध्ये मतभेद नाहीत - संजय राऊत

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स