LIVE NOW

LIVE : कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी घडामोड, महाराष्ट्रात होणार महत्त्वाची बैठक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | January 24, 2021, 9:50 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated January 24, 2021
auto-refresh

Highlights

9:50 pm (IST)

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाचा प्रश्न सोडवा ...अन्यथा विधानसभेचं कामकाज बंद पाडू, माजी मंत्री बबनराव लोणीकरांचा राज्य सरकारला इशारा

8:41 pm (IST)

राज्यात कमी होतोय कोरोनाचा धोका
राज्यात दिवसभरात 2,752 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 45 जणांचा मृत्यू

8:13 pm (IST)

पनवेल - खारघर गोळीबारातील चौघांना अटक
कोपरा गावातील CCTV फुटेजमुळे गजाआड
24 तासांत चौघांच्याही मुसक्या आवळल्या
हॉटेल व्यवसायासाठी करत होते लुटमार

8:07 pm (IST)

नावीन्य, शैक्षणिक, क्रीडा, कला व संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या क्षेत्रांमध्ये 32 मुलांना त्यांच्या अपवादात्मक क्षमता आणि   उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं आहे -महिला आणि बालविकास मंत्रालय

7:26 pm (IST)

गोवा - 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
सर्वोत्कृष्ट गोल्डन पिकॉक पुरस्कार 
डेन्मार्कच्या इन टू द डार्कनेस चित्रपटाला
सर्वोत्कृष्ट अभिनेता - तैवानचा तुज बलियू
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - पोलंडची झोफिया स्टाफिज
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - तैवानचा को सेन नेईन
पदार्पणासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार
ब्राझीलच्या कॅसिओ सान्तोस यांना जाहीर
स्पेशल जुरी - भारताचे कृपाल कालिटा (ब्रीज चित्रपट)
मनाचे युनेस्को गांधी मिडल पुरस्कार
जॉर्डनच्या आमीन नियफिह यांना जाहीर

6:41 pm (IST)

बेकायदा सावकारीतून सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांना लावणार मोक्का, जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भरला दम

6:30 pm (IST)

कर्नाटक सीमाप्रश्नी 27 जानेवारीला बैठक
सह्याद्री अतिथीगृहावर होणार महत्वाची बैठक
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
शरद पवार, अशोक चव्हाण उपस्थित राहणार
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर उपस्थित राहणार

6:05 pm (IST)

सातारा - दूध टँकरचालकानं 15 वाहनं उडवली, मद्यधुंद चालकाचा थरार, अपघातात 7 जण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू, मद्यधुंद दूध टँकरचालक सातारा पोलिसांच्या ताब्यात

5:59 pm (IST)

नागपुरात चिकन फेस्टिव्हलचं आयोजन
'बिनधास्त अंडी, चिकन खा, तंदुरुस्त राहा'
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचं आवाहन

4:35 pm (IST)

नाशिकमध्ये भरणार सारस्वतांचा 94 वा मेळा
संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर
जयंत नारळीकर संमेलनाचे नवे अध्यक्ष
पहिल्यांदाच वैज्ञानिक साहित्यिकाला संधी

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स