पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात्यात
सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचं निमित्त
नेताजी बोस यांना मोदींकडून अभिवादन
नेताजींना जन्म देणाऱ्या मातेला नमन -मोदी
नेताजींची जयंती 'पराक्रम दिवस' म्हणून साजरी
बंगालच्या पवित्र भूमिला अभिवादन -मोदी
बंगालमध्ये अनेक समाजसुधारकांचा जन्म
बंगालच्या भूमीनं अनेक शूरवीर दिले -मोदी
16:51 (IST)
बजेटआधी संसदेत हलवा समारंभ संपन्न
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची उपस्थिती
केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर उपस्थित
अर्थ मंत्रालयाचे सचिव, अधिकारीही उपस्थित
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाची छपाई नाही
तसेच आर्थिक सर्वेक्षणाचीही छपाई होणार नाही
16:40 (IST)
पुण्यात अनेक ठिकाणी एनसीबीची धाड
अंमली पदार्थांचा साठा असल्याची शंका
चिंकू पठाणच्या मोठ्या बॉसवर धाड
16:34 (IST)
नवी मुंबईत भाजपला आणखी एक धक्का
भाजप नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश
नगरसेवक राम आशिष यादव शिवसेनेत
मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश
आतापर्यंत 13 नगरसेवकांची भाजपला सोडचिठ्ठी
15:43 (IST)
मुंबई - 26 डिसेंबर 2020 रोजी ग्रँट रोड रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या प्रवाशाला वाचविण्यासाठी धावत्या ट्रेनसमोर उडी घेणाऱ्या महिला सुरक्षारक्षक लता बनसोडे यांना शौर्य पुरस्कार जाहीर; सरकारनं घेतली लता बनसोडे यांच्या धाडसाची दखल
15:40 (IST)
धुळे शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी
नगाव गावाजवळ तापीच्या जलवाहिनीला गळती
गळतीमुळे लाखो लीटर शुद्ध पाण्याची नासाडी
तापी नदीतून धुळे शहराला होतो पाणीपुरवठा
15:10 (IST)
मुंबई पालिकेची आर्थिक घडी विस्कटली?
'कॅश बॉण्डचा वापर करत पैसे उभारणार'
'बीएसईवर लिस्ट होत कॅश बॉण्ड मार्फत पैसे'
'कोविडचा खर्च, जीएसटीचा परतावा बाकी'
'मोठ्या प्रकल्पामुळे मनपा आर्थिक संकटात?'
महापौर, गटनेते, प्रशासनाची होणार बैठक
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स