LIVE NOW

LIVE: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील लसीकरण शनिवार, रविवार बंद

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | June 12, 2021, 12:02 AM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated 5 days ago
auto-refresh

Highlights

9:55 pm (IST)

मुंबईतील 'ब्रेक द चेन'-याआधीच्या आदेशात बदल नाही, मनपा आयुक्त इक्बाल चहल यांनी काढला आदेश, लोकसंख्येची घनता, लोकल प्रवासीसंख्या आणि अतिवृष्टीचा इशारा पाहता पुढील आदेशापर्यंत लेव्हल-3 नुसारच नियम लागू राहणार

8:23 pm (IST)

10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
विद्यार्थ्यांनी शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव 12 ते 21 जून या मुदतीत द्यावा, 
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे 15 ते 25 जून या दरम्यान प्रस्ताव द्यावा; 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 8वी, 9वीतील क्रीडा स्पर्धांमधील सहभाग आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 11वीतील क्रीडा स्पर्धांमधील सहभाग ग्राह्य धरण्यात येणार

7:06 pm (IST)

एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला इथं रोपवेसाठी तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य करार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या

7:05 pm (IST)

माळशेज घाटात गाडीवर कोसळली दरड
गाडीचा चक्काचूर, सुदैवानं दुखापत नाही 
दु.4 पासून माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद
घाटात कॉंक्रीटीकरणाचं काम सुरू होतं

7:01 pm (IST)

13, 14 तारखेला मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई शहर, उपनगरात काही ठिकाणी शक्यता
समुद्रकिनाऱ्यांवर जाणं लोकांनी टाळावं - प्रशासन

6:49 pm (IST)

कोविड वैद्यकीय व्यवस्थापनावरील बृहन्मुंबई महापालिकेच्या पुस्तकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

6:26 pm (IST)

औरंगाबाद शहरातील कोरोना आटोक्यात येतोय, तरीही नियम अमलात आणणं आवश्यक, 21 तारखेनंतर 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाची मोहीम होणार सुरू - पालकमंत्री सुभाष देसाई

6:22 pm (IST)

मुंबई मनपा क्षेत्रातील नाले, गटारींमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई, कडक कारवाईसोबतच जनजागृती करण्यावरही भर देणार, दंड आकारणी प्रभावीपणे करण्यासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर प्रस्तावित

5:50 pm (IST)

ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात
गेल्या अर्ध्या तासापासून ठाण्यात पाऊस
मुख्य मनपा इमारतीबाहेर पाणी साचणं सुरू

5:39 pm (IST)

मुकुल रॉय यांची अखेर घरवापसी
मुकुल रॉय यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स