सोलापूर, 26 जुलै : कोरोनामुळे राज्यावर मोठं संकट ओढावलं आहे. अशा या जीवघेण्या महामारीला आवर घालण्यासाठी मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. राज्यात लॉकडाउन कधी उठणार असे सवाल विचारले जात आहे. यात सोलापूर जिल्ह्यासह 4 तालुक्यातील लॉकडाऊन आज रात्रीपासून उठणार आहे. मात्र संपूर्ण बार्शी तालुक्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये लॉकडाऊन ऩसला तरी नियम तेच ठेवण्यात आले आहेत. सोलापूरमध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण आणि रुग्णांचे मृत्यू बार्शी तालुक्यात झाले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
बेरोजगारांसाठी दिलासादायक बातमी, कोरोनाच्या संकटात नवाब मलिकांनी दिली माहिती
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत लॉकडाउन कधी आणि कसा उठवणार याबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. तसंच ‘‘लॉकडाऊन उठवा, हे उघडा आणि ते उघडा असे सांगणारे लोकांच्या जीविताची जबाबदारी घेणार आहेत काय? पुनश्च हरिओमचा अर्थ समजून घ्या.’’ असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
'कोरोनाच्या संकटाबद्दल मला आधी एक सांगायचंय की, हे कोरोनाचं संकट ते अजूनही संपता संपत नाहीय. मी माझ्या एका फेसबुक लाइव्हमध्ये म्हटलंसुद्धा होतं की, ‘सरणार कधी रण…’ हे रण कधी सरणार हेच कळत नाही अजूनही.' असं स्पष्ट उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
कोरोनात नोकरी गेल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल, लेकीला संपवून दांपत्याची आत्महत्या
तसंच, 'मुळात हे रणच आहे. रणकंदन आहे. मोठं जागतिक रण आहे. जसं मी मागेच म्हटलं होतं की, वर्ल्डवॉर असून वॉर अगेन्स्ट व्हायरस आहे. हे फार भयानक आहे. हे खरं विश्वयुद्ध आहे. कारण त्याने पूर्ण जग व्यापून टाकलंय. आजसुद्धा ज्यांनी घाईगर्दीने लॉकडाऊन उठवला किंवा सगळं काही संपलं असं समजून लॉकडाऊन उठवला, ते देश आता परत लॉकडाऊन करताहेत. ऑस्ट्रेलियाचं उदाहरण घ्या. तुम्ही ऐकलं असेल की, त्यांनी काही भागांत सैन्याला पाचारण केलं.' असंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus