परश्या गेला विहिरीत पोहायला, पोलिसांना म्हणाले उघड्या अंगावर नका मारू, पाहा हा VIDEO

परश्या गेला विहिरीत पोहायला, पोलिसांना म्हणाले उघड्या अंगावर नका मारू, पाहा हा VIDEO

नागरिकांना घरी बसण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून वारंवार कऱण्यात आलं आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. आतापर्यंत 700 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात हा आकडा 130 पर्यंत पोहोचला आहे. तर आतापर्यंत 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून वारंवार आव्हान करूनही नागरिक ऐकत नाही असं लक्षात येत आहे. लोक दुकानांबाहेर गर्दी करत आहेत. वारंवार सांगूनही अजूनही लोकांना लॉकडाऊनचं आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावचं गांभीर्य समजलं नाही. त्यामुळेच लॉकडाऊनच्या घोषणेनंतरही अनेकजण रस्त्यांवरून मजा म्हणून फिरताना दिसत होते. देशभरातील अनेक शहारांमध्ये पोलिसांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं या फिरणाऱ्या आणि गर्दी करणाऱ्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. कधी उठाबशा काठायला लावून तर कधी भर रस्त्यात आपल्या दांडूक्यानं प्रसाद देऊन तर काही ठिकाणी ओवाळून नागरिकांना घरी बसण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून वारंवार कऱण्यात आलं आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असाच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे वाचा-रेपो दरात कपात करण्याव्यतिरिक्त RBI च्या 5 महत्त्वाच्या घोषणा

या व्हिडीओमध्ये काही तरुण सरकार आणि पोलिसांचे सर्व नियम धाब्यावर बसवून बिनधास्त विहिरीमध्ये पोहायला गेले आहेत. सरकार वारंवर घरात बसा असं सांगत असतानाही जीव धोक्यात घालून हे सर्वजण मजा करत होते. याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली त्यांनी घटनास्थळी पोहोचून विहिरीत पोहणाऱ्या या तरुणांना लाठीचा प्रसाद दिला आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता तरुण विहिरीत पोहोण्यासाठी एकत्र गेले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून सरकारनं घरी बसायला सांगितलं असताना अशा पद्धतीनं गावात विहिरीत मजा करायला गेलेल्या या तरुणांना पोलिसांनी प्रसाद दिला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे.

हे वाचा-कोल्हापुरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बायको, मुलासह 30 जणांच्या संपर्कात

First published: March 27, 2020, 12:50 PM IST

ताज्या बातम्या