मुंबई, 15 ऑगस्ट : राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रोज कोरोनाचे धक्कादायक आकडे समोर येत असताना आजही राज्यात रुग्णांचा मोठा आकडा समोर आला आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 12614 नवीन रुग्ण समोर आले आहेत. गेल्या 24 तासात राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 322 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात संक्रमित लोकांची एकूण संख्या 584754 वर पोहोचली आहे. यापैकी 156409 सक्रिय रुग्ण असून राज्यात 408286 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
राज्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 19749 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 6844 लोक बरे झाले आहेत. सगळ्यात मोठी चिंतेची बाब म्हणजे कोरोना विषाणूचे सगळ्यात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रातमध्ये आहेत.
पत्नी माहेरी गेली म्हणून आला राग, माजी सैनिकाने केला धक्कादायक प्रकार
दरम्यान, रशियाने तयारकेलेल्या लशीवर भारताने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जगातील सर्वात पहिली कोरोना लस (russian corona vaccine) तयार केली आहे. त्यामुळे लशीची प्रतीक्षा करणाऱ्या कित्येकांना आता आशेचा किरण दिसू लागला आहे. रशियाने आपल्याला अनेक देशांनी या लशीच्या डोससाठी ऑर्डर दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भारतातही ही लस दिली जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यात ST बस आणि कोचिंग क्लासेस होणार सुरू, विजय वडेट्टीवार यांची माहिती
रशियाने तयार केलेल्या कोरोना लशीला स्पुतनिक व्ही (Sputnik V) असं नाव दिलं आहे. या लशीसाठी 20 पेक्षा अधिक देशांकडून अब्जावधी डोसच्या ऑर्डर आल्या आहेत. त्यात भारताचही समावेश आहे. असं रशियाने याआधी सांगितलं आहे.
मात्र चाचण्या पूर्ण न झाल्याने लशीच्या सुरक्षिततेबाबत जागतिक आरोग्य संघटनेनंही प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. त्यामुळे सर्व निकष गांभीर्याने तपासूनच ही लस भारतात दिली जाईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.