मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

महाराष्ट्र राज्य Corona मुक्तीच्या दिशेनं?, 19 ठिकाणांहून समोर आली दिलासादायक बाब

महाराष्ट्र राज्य Corona मुक्तीच्या दिशेनं?, 19 ठिकाणांहून समोर आली दिलासादायक बाब

Maharashtra Corona Update:काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आला कोरोना व्हायरसनं (Corona virus) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातून एक दिलासादायक बातमी समोर येतेय.

 • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 20 मार्च: काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आला कोरोना व्हायरसनं (Corona virus) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. पुन्हा एकदा चीन, युरोप खंड आणि फ्रान्समध्ये कोरोना रुग्णाची संख्या झपाट्यानं वाढताना दिसून येतेय. त्यामुळे जगभरातल्या देशांना भीती वाटत आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातून एक दिलासादायक बातमी समोर येतेय. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या (corona patients) झपाट्यानं कमी होताना दिसत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर महत्त्वाच्या भागात मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे. काल म्हणजेच शनिवारी राज्यभरात केवळ 97 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आरोग्य विभागानं ही माहिती दिली. सर्वांत दिलासा देणारी बातमी म्हणजे, राज्यात असे 19 ठिकाणं आहेत जिथे शनिवारी एकाही नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही.

विशेष म्हणजे शनिवारी राज्यात कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यत सर्वात कमी रुग्णसंख्या आढळून आली आहे. काल एप्रिल 2020 पासून सर्वात कमी रुग्ण आढळलेत.

शनिवारी या ठिकाणी एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही

 • ठाणे
 • उल्हासनगर
 • भिवंडी
 • निजामपूर मनपा
 • मीरा भाईंदर मनपा
 • वसई विरार मनपा
 • पनवेल मनपा
 • मालेगाव मनपा
 • धुळे
 • धुळे मनपा
 • जळगाव
 • जळगाव मनपा
 • नंदूरबार
 • सोलापूर
 • कोल्हापूर
 • सांगली
 • सांगली मिरज कुपवाड मनपा
 • सिंधुदुर्ग
 • रत्नागिरी

शनिवारी राज्यात 100 च्या आत नवे कोरोना रुग्ण

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होताना दिसतआहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने आटोक्यात आली आहे. तसंच मृताच्या संख्येतही मोठी घट झाली आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी फक्त 97 नव्या रुग्णांची नोंद झाल्याचं आढळून आलं.

कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर म्हणजेच तब्बल दोन वर्षानंतर राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. याआधी राज्यात एप्रिल 2020 मध्ये कोरोना रुग्णसंख्या शंभरच्या आत होती. शनिवारी राज्यात 97 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागानं ही आकडेवारी जारी केली आहे. सातारा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

शनिवारी राज्यात 251 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77,23,005 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.10% इतकं आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे.

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus cases, Maharashtra News