Home /News /news /

'त्या' 12 लाख RTPCR किट्स सदोष, आरोग्य मंत्री राजेश टोपेंची कबुली

'त्या' 12 लाख RTPCR किट्स सदोष, आरोग्य मंत्री राजेश टोपेंची कबुली

भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्या आरोपानंतर अखेर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कबुली दिली आहे.

जालना, 13 : 'महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संसर्गाची तपासणी करण्यासाठी आलेल्या 12 लाख 50 हजार किट्स या सदोष असल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच, 'GCC कंपनीच्या या सगळ्या सदोष किट्स तात्काळ बाजूला ठेवून एनआयव्ही या केंद्र सरकारच्या डिपार्टमेंटच्या किट्सवर चाचण्या करण्यात येत आहेत, अशी माहितीही टोपे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी, '12 लाख 50 हजार पेक्षा अधिक सदोष असणाऱ्या RTPCR किट्स खरेदी करण्यात आल्या आहेत. या खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार देखील झालेला आहे,' असा गंभीर आरोप केला होता. लोणीकर यांच्या आरोपानंतर अखेर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कबुली दिली आहे. 12 लाख 50 हजार  किट्स या सदोष असल्याची माहिती टोपे यांनी दिली. 'या सगळ्या सदोष कोरोना चाचणी किट्स वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने खरेदी केलेल्या आहेत.  तेच खरेदी करतात. यापुढे आम्ही प्रत्येक किट्सची बॅच तपासणी करून मगच पुढे पाठवू, असं म्हणत म्हणत राजेश टोपे यांनी आरोग्य खात्याची पाठराखण केली. डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं, 9 महिन्यातील चौथी घटना कोरोना संसर्गाच्या कालावधीदरम्यान अँटीजन आणि आरटीपीसीआर अशा दोन प्रकारच्या चाचण्या प्रामुख्याने केल्या जातात. त्यातील अँटीजन चाचणी केल्यानंतर 06 ते 15 टक्क्यांपर्यंत खात्रीशीर निदान होते. परंतु आर टी पी सी आर या चाचणीमध्ये 30 टक्के खात्रीशीर निदान केले जाते, अशी मान्यता आहे. त्यासाठी 12 लाख 50 हजार कीट्स खरेदी करण्‍यात आल्या होत्या. काय म्हणाले होते लोणीकर? 'कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी आलेल्या या किट्स सदोष असल्याचे लक्षात आले असून आरटीपीसीआर लॅबोरेटरीमध्ये 05 ऑक्टोबर पासून या किट्सचा वापर केल्यानंतर जालन्यात कोरोना व्हायरस संसर्गाच्या रूग्णांचे अहवाल देखील निगेटिव्ह येत आहेत. आयएमसीआरच्या तपासणीमध्ये हे सिद्ध झाले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून कोरोनाग्रस्त रुग्णांना नकारात्मक रिपोर्ट मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा उपचार केला जाणार नाही. त्यात आणखी गंभीर बाब म्हणजे नकारात्मक रिपोर्ट मिळाल्यानंतर हे रुग्ण बिनधास्तपणे बाहेर फिरणार असून त्यांच्यामुळे इतरांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण खूप भयानक असणार आहे ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे', असं लोणीकर यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिलं होतं.
Published by:sachin Salve
First published:

Tags: राजेश टोपे

पुढील बातम्या