Home /News /news /

महाराष्ट्रात कोरोनाने गाठला 30 हजाराचा टप्पा, राज्यात एका दिवसात 67 मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाने गाठला 30 हजाराचा टप्पा, राज्यात एका दिवसात 67 मृत्यू

मात्र ‘हर्ड इम्युनिटी’ हा काही पर्याय होऊ शकत नाही असं मत Institute of Liver and Biliary Sciences चे संचालक डॉ. एस.के. सरीन यांनी म्हटलं आहे.

मात्र ‘हर्ड इम्युनिटी’ हा काही पर्याय होऊ शकत नाही असं मत Institute of Liver and Biliary Sciences चे संचालक डॉ. एस.के. सरीन यांनी म्हटलं आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 61 हजार 783 नमुन्यांपैकी 2 लाख 31 हजार 071 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 30 हजार 706 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

    मुंबई, 16 मे : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 30 हजार 706 झाली आहे. आज 1606 नविन रुग्णांचे निदान झाले असून आज 524 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 7088 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 22 हजार 479 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 61 हजार 783 नमुन्यांपैकी 2 लाख 31 हजार 071 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 30 हजार 706 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 34 हजार 558 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 48 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. पोलिसांच्या 'आशिर्वादा'ने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर खूनी खेळ, एकाची हत्या राज्यात 67 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी 22 मृत्यू हे गेल्या 24 तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 41, पुण्यात 7, ठाणे शहरात 7, औरंगाबाद शहरात 5, जळगावमध्ये 3, मीरा भाईंदरमध्ये 2, नाशिक शहरात 1 तर सोलापूर शहरामध्ये 1 मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 47 पुरुष तर 20 महिला आहेत. 67 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 38 रुग्ण आहेत तर 25 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहे. या 67 रुग्णांपैकी 44 जणांमध्ये (66टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनानंतर आता पावसानं ओढावलं संकट, मुंबईत एकाचा मृत्यू तर 7 कुटुंब उघड्यावर राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: मुंबई महानगरपालिका: 18,555 (696) ठाणे: 205 (3) ठाणे मनपा: 1416 (18) नवी मुंबई मनपा: 1282 (14) कल्याण डोंबिवली मनपा: 502 (6) उल्हासनगर मनपा: 100 भिवंडी निजामपूर मनपा: 46 (2) मीरा भाईंदर मनपा: 283 (4) पालघर: 50 (2) वसई विरार मनपा: 340 (11) रायगड: 218 (2) पनवेल मनपा: 196 (10) ठाणे मंडळ एकूण: 23,209 (768) नाशिक: 102 नाशिक मनपा: 66 (1) मालेगाव मनपा: 667 (34) अहमदनगर: 56 (3) अहमदनगर मनपा: 16 धुळे: 10 (3) धुळे मनपा: 67 (5) जळगाव: 193 (26) जळगाव मनपा: 57 (4) नंदूरबार: 22 (2) नाशिक मंडळ एकूण: 1256 (78) पुणे: 189 (5) पुणे मनपा: 3302 (179) पिंपरी चिंचवड मनपा: 156 (4) सोलापूर: 9 (1) सोलापूर मनपा: 362 (21) सातारा: 131 (2) पुणे मंडळ एकूण: 4149 (212) कोल्हापूर: 21 (1) कोल्हापूर मनपा: 6 सांगली: 38 सांगली मिरज कुपवाड मनपा: 7 (1) सिंधुदुर्ग: 7 रत्नागिरी: 91 (3) कोल्हापूर मंडळ एकूण: 173 (5) औरंगाबाद: 97 औरंगाबाद मनपा: 776 (25) जालना: 21 हिंगोली: 66 परभणी: 5 (1) परभणी मनपा: 1 औरंगाबाद मंडळ एकूण: 966(26) लातूर: 33 (1) लातूर मनपा: 0 उस्मानाबाद: 7 बीड: 1 नांदेड: 5 नांदेड मनपा: 54 (4) लातूर मंडळ एकूण: 101 (5) अकोला: 19 (1) अकोला मनपा: 216 (13) अमरावती: 4 (2) अमरावती मनपा: 79 (11) यवतमाळ: 99 बुलढाणा: 26 (1) वाशिम: 3 अकोला मंडळ एकूण: 466 (28) नागपूर: 2 नागपूर मनपा: 350 (2) वर्धा: 2 (1) भंडारा: 1 गोंदिया: 1 चंद्रपूर: 1 चंद्रपूर मनपा: 4 गडचिरोली: 0 नागपूर मंडळ एकूण: 361 (3) इतर राज्ये: 41 (10) एकूण: 30 thousand 706 (1135) दरम्यान, राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1516 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 14 हजार 434 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 60.93 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या