सोनिया गांधींवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वाद पेटला, सुनिल केदारांची आक्रमक प्रतिक्रिया

सोनिया गांधींवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वाद पेटला, सुनिल केदारांची आक्रमक प्रतिक्रिया

सुनिल केदार यांनी केली टीका खोटी असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांच्याकडून देण्यात आली तर मी जे ट्विट केलं आहे त्या ट्विटवर मी आजही कायम आहे असल्याचं सुनिल केदार म्हणाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : काँग्रेसमध्ये सध्या अध्यक्षपदावरून वाद सुरू आहे. काँग्रेसचा अध्यक्ष बदला अशी मागणी काही नेत्यांकडून करण्यात आली होती. याचं एक पत्र सोनिया गांधी यांना देण्यात आलं होतं. यावरच महाराष्ट्राचे दुग्धविकासमंत्री आणि काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी वरिष्ठ नेत्यांवर टीका केली आहे. यावरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये महाभारत सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सुनिल केदार यांनी केली टीका खोटी असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांच्याकडून देण्यात आली तर मी जे ट्विट केलं आहे त्या ट्विटवर मी आजही कायम आहे असल्याचं सुनिल केदार म्हणाले आहेत. तीन नेत्यांवर कारवाई करायची की नाही पक्षाने ठरवावं. पण आज काँग्रेसची बैठक आहे त्यात मी आपलं मत मांडणार असल्याचं सुनिल केदार म्हणाले.

'महाराष्ट्रातील ज्या बुद्धिवंत नेत्यांनी आपली भूमिका व्यक्त केली. त्यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल चुकीचे मत व्यक्त केलं. म्हणून मी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. या तीन नेत्यांनी त्यांच्या पत्रातून जे म्हंटले, त्याच्यातून त्यांची भूमिका स्पष्ट होते. पक्षाने त्यांच्याबद्दल कारवाई करावी. मी पक्षाच्या फोरमवर माझी भूमिका मांडणार आहे' अशी प्रतिक्रिया सुनिल केदार यांनी माध्यमांना दिली आहे.

काय ट्वीट केलं होतं सुनिल केदारांनी?

संपूर्ण पक्ष सोनिया गांधी यांच्या पाठिशी आहे. अशात गांधी कुटुंबाच्या कामावर मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी प्रश्न उपस्थित करणं ही लाजिरवाणी बाब आहे. या नेत्यांनी त्यांनी केलेल्या कृत्यावर तातडीने माफी मागावी. असं झालं नाही तर काँग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात कुठेही फिरकू देणार नाही असं सुनिल केदार यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाही तर ते पुढे म्हणाले की, काँग्रेस नेतृत्त्व गांधी घराण्याकडे असेल तरच भाजपविरोधात लढता येईल. त्यामुळे सोनिया गांधी यांच्यामागे ठामपणे उभं राहण्याची हीच खरी वेळ असल्याचं सनिल केदार यांनी म्हटलं आहे.

मोठी बातमी, लॉकडाउनच्या अटींचे लवकरच विसर्जन, 'हा' निर्णय घेण्याची शक्यता

कोण सांभाळणार पार्टीची कमान?

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक (CWC) होणार असून त्यामध्ये नेतृत्वाच्या प्रश्नावर मोकळेपणाने चर्चा होऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे. वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष बदलावा अशी पत्राद्वारे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मागणी केल्यानंतरच ही CWC ची ही बैठक होत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागपूरमध्ये 50 वर्ष जुनी इमारत कोसळली, मलब्याखाली दबून एकाचा जागीच मृत्यू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पक्षाध्यक्षपदी रहाण्याची इच्छा नाही असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. त्यामुळे आजच्या या बैठकीत सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात असं राजकीय चर्चा सुरू आहे. CWC च्या या बैठकीत कॉंग्रेस नेतृत्वासह इतर प्रश्नांवरही गांधी कुटुंबियांकडून चर्चा होऊ शकते. तर 'मी अंतरिम अध्यक्षपदाचा 1 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे आणि आता पक्षाध्यक्षपदाचा पद सोडायचा आहे' अशी माहिती सोनिया गांधी यांनी नेत्यांना दिली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काँग्रेसची कमान कोणाकडे जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कोण सांभाळणार काँग्रेसची कमान, आजच्या बैठकीत होणार मोठा निर्ण

बैठकीनंतर पक्षाकडे कोणते आहेत पर्याय?

जर सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याचं ठरवलं तर पुढे काय असा प्रश्न उपस्थित होतो. अशात दोन मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. पहिलं तर CWC ने सोनिया गांधींचा राजीनामाच स्वीकारू नये. त्यांनी अध्यक्षपद सांभाळावं यासाठी दबाव आणावा. अशात सोनिया गांधी आरोग्याचंही कारण पुढे करू शकतात. त्यामुळे सूरतमधील काही ज्येष्ठ नेत्यांना अध्यक्ष बनवण्यावर चर्चा होऊ शकते.

तर दुसरा मुद्दा म्हणजे सोनिया गांधी यांचा राजीनामा स्विकारत CWC च्या वतीने राहुल गांधींना पुन्हा अध्यक्षपदासाठी अपील करण्यात येईल. अशात जर बैठकीमध्ये या दोन्ही परिस्थितीवर सकारात्मक चर्चा झाली नाही तर गांधी घराण्याव्यतिरिक्त अध्यक्षांच्या नावावर चर्चा होऊ शकते. पण याची शक्यता कमी असल्याचंही बोललं जात आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 24, 2020, 11:42 AM IST
Tags:

ताज्या बातम्या