Home /News /news /

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत TOP-5 मध्ये उद्धव ठाकरे, पटकावलं चौथं स्थान

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत TOP-5 मध्ये उद्धव ठाकरे, पटकावलं चौथं स्थान

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांनी स्थान पटकावलं आहे.

    मुंबई, 21 जानेवारी: देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांनी स्थान पटकावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टॉप पाचच्या (Popular Chief Ministers) यादीत असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशननं हा अहवाल दिला आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानावर आहेत. पुण्यात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; 700 रुपयांत बांगलादेशी नागरिकांना दिलं जात होतं आधार कार्ड  इंडिया टुडे-सीव्होटर द्विवार्षिक मूड ऑफ द नेशन सर्व्हे-2022 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे चौथे स्थान मिळवलं आहे. ओडिशातील एकूण 2 हजार 743 जनतेपैकी जवळपास 71 टक्के जनतेने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या कामाशी समाधानी असल्याचं सांगितलं. तर पश्चिम बंगालमधील 4 हजार 982 लोकांपैकी 69 टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे. लोकांनी मुख्यमंत्र्यांना दिलेली पसंती खालीलप्रमाणे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना 67.5 टक्के महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 61.8 टक्के केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन 61.1टक्के दिल्लीचे अरविंद केजरीवाल 57.9 टक्के आसामचे हिमंता बिस्वा सरमा 56 टक्के छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 51.4 टक्के पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. जगातील लोकप्रिय नेत्यांच्या (Popular Leaders) यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर आहे. जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) 71 टक्के रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत. Goa Assembly Election: उत्पल पर्रिकरांसाठी BJP चा मेगा प्लान, दिली मोठी ऑफर 13 जागतिक नेत्यांच्या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US president Joe Biden) 43 टक्के रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रुडो (Canadian President Justin Trudeau)यांचे नाव आहे. त्यांनाही 43 टक्के रेटिंग मिळाले असून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison)यांना 41 टक्के रेटिंग देण्यात आले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये देखील पंतप्रधान मोदींचे नाव जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Cm, Shivsena, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या