मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मोदींनी दिलं सहकार्याचं वचन, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे

मोदींनी दिलं सहकार्याचं वचन, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे

लोकांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसोबत संवाद साधला.

लोकांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसोबत संवाद साधला.

लोकांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसोबत संवाद साधला.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 19 मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसोबत संवाद साधला. लोकांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी हा संवाद साधला आहे. यावेळी प्रशासनानं दिलेल्या सूचनांव्यतिरीक्त इतर कोणत्याही सूचनांचं पालन करू नका असं आवाहनही त्यांनी केलं. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सरकारला सहकार्य करण्याचं आवाहनही जनतेला केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जनतेसोबत जो संवाद साधला त्यातील महत्त्वाचे 10 ठळक मुद्दे पाहा. 1. सुरू झालं आहे. हे एक विषाणूविरोधात युद्ध आहे. गर्दी अजून कमी व्हायला हवी. सरकारनं दिलेल्या सूचना पाळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं आहे. 2. लोकलची गर्दी ओसरली असली तरीही अजून लोकल, बस आणि मेट्रोची गर्दी आणखीन कमी होण्याची गरज आहे. यंत्रणेवरचा भार कमी करणं ही आपली जबाबदारी आहे. 3.संकट हे संकट आहे त्यामुळे जात पात धर्म या पलिकडे जाऊन एकजुटीनं ह्या संकटाचा सामना करायला हवा. 4. कोरोनाग्रस्त रुग्ण अपराधी नाहीत. कोरोनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मी बोललो आहे. केंद्र सरकार कडून राज्य सरकारला पूर्ण सहयोग आहे. 5. आपण सुरक्षित राहा ,आणि घर सुरक्षित राहा. कामाशिवाय बाहेर पडू नका. 6.आपण जागतिक युद्ध लढत आहोत. कोरोनाशी लढ्यानसाठी यंत्रणा सज्ज आहे.घाबरून युद्ध जिंकलं जात नाही. 7.राज्यात जीवनश्याक वस्तूंच्या पुरेसा साठा आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. 8. सर्व उपाययोजना करण्यास महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे 9. धार्मिक स्थळी जाणे टाळा आणि गर्दी न करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 10. संकटावर सगळे मिळून मात करू शकतो. त्यासाठी आपण यंत्रणेवर भार पडू न देता जबाबदारीनं वागायला हवं. असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
राज्यात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण सापडले आहे. मुंबईमध्ये दोन महिलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यात एकूण 49 तर देशात 170 हून अधिक रुणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशात सुरक्षा म्हणून राज्यात सगळ्यात महत्त्वाच्या शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. काल महाराष्ट्रात 4 कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची नोंद झाली आणि आता हा आकडा 49 पर्यंत पोहोचला आहे. काल पहिल्यांदा पुण्यातून एका पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर मुंबईतून 68 वर्षांची महिला, पिंपरी-चिंचवडमधील 21 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद करण्यात आली. रत्नागिरीतूनही 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधित (Covid - 19) रुग्णांची संख्या 49 वर गेली आहे. कोरोनाला रोखण्यााठी सरकारने केले मोठे बदल 1. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. 2. रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 3. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल. 4 शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील की, सर्व दुकाने अंतरा-अंतराने सकाळी व दुपारी सुरू होतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्ये देखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल. 5. दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्री देखील उपलब्ध आहेत.
First published:

Tags: BJP, Coronavirus symptoms, PM narendra modi, Uddhav tahckeray

पुढील बातम्या