चार दिवसांमध्ये दोन वेळा भेटले उद्धव ठाकरे आणि फडणवीस, पाहा PHOTOS

  • Share this:

महाराष्ट्रातल्या सत्त्ता संघर्षानंतर भाजप आणि शिवसेनेत कटुता निर्माण झालीय. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी दोघांमधली मैत्री कायम असल्याचं जाहीरपणे सांगितलंय.

नागपुरात होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्याला विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्रीही हजर होते.

बैठकीत आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोकळेपणाने हस्तांदोलन केलं. यावेळी सगळ्यांच्या नजरा या दोन नेत्यांवर लागल्या होत्या.

विधानसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपमुळेच ही वेळ आल्याचं म्हटलं होतं. शब्द पाळला असता तर मी हे सगळं घरी बसून टीव्हीवर पाहिलं असतं असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

पंतप्रधान पुणे दौऱ्यावर आले असतानाही त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच फडणवीसही गेले होते.

त्यावेळी दोघांमधेही बातचित झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. राजकारणात आम्ही विरोधक असलो तरी मैत्री कायम आहे असंही त्यांनी सांगितलं होतं.

राजकारणात केव्हा, कधी, काय होईल कुठली भूमिका घ्यावी लागेल हे काहीच सांगता येत नाही. त्यामुळे कितीही कटुता आली तरी चर्चेचा एक मार्ग हा कायम खुला ठेवावा लागतो. त्यामुळे हे दोनही नेते सत्ता स्थापनेनंतरही भेटताना दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2019 08:54 PM IST

ताज्या बातम्या