Elec-widget

राहुल गांधींना 'तो' व्हिडिओ टि्वट करणे भोवले

राहुल गांधींना 'तो' व्हिडिओ टि्वट करणे भोवले

परंतु या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून पीडित मुलांचा व्हिडिओ अपलोड करुन बाल हक्क कायद्यानुसार उल्लंघन झाले आहे

  • Share this:

मुंबई, 19 जून :महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी इथं विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याचे प्रकरण देशभर गाजत आहे.

या घटनेसंदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर भाष्य करून एक व्हिडिओही ट्विटरवर अपलोड केला होता.

या घटनेसंबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्या आरोपींवर "पॉक्सो" अंतर्गत अॅट्रोसिटी दाखल करण्यात आली आहे.

हे तर संघ आणि भाजपचं मनुवादी राजकारण- राहुल गांधी

परंतु या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून पीडित मुलांचा व्हिडिओ अपलोड करुन बाल हक्क कायद्यानुसार उल्लंघन झाले आहे असं बाल हक्क आयोगाकडे आलेल्या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे.

Loading...

बाल न्याय अधिनियम कायद्यातील "कलम 74" नुसार कुठल्याही पीडित बालकाचे फोटो, व्हिडिओ किंवा त्याचे नाव जाहीर न करणे जेणेकरून त्यांची ओळख पटू नये असं म्हटले आहे.

VIDEO : पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारा, हाच तो व्हिडिओ

राहुल गांधी यांनी यासंबंधीत मुलांचा व्हिडिओ ट्विटर वर व्हायरल केल्याने या कायद्याचा भंग होत असून तसंच "बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा" (पॉक्सो) नुसार या आरोपींवर गुन्हा दाखल केलेला असतानाही या कायद्यातील "कलम 23" अन्वये अशा प्रकारचा कुठलाही व्हिडिओ अथवा फोटो प्रसारीत करणे गुन्हा म्हटलं आहे.

याही कायद्याचे राहुल गांधी यांच्या कडून उल्लंघन झालेले असल्याने या विषयात स्पष्टीकरण देण्यासाठी राहुल गांधी यांना महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाने नोटीस बजावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2018 08:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...