News18 Lokmat

मंत्रिमंडळ विस्ताराचा उद्याचा मुहूर्त टळला; सस्पेन्स कायम

पावसाळी अधिनेशनाच्या पार्श्वभूमिवर उद्या होणारा मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स कायम आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2019 11:56 AM IST

मंत्रिमंडळ विस्ताराचा उद्याचा मुहूर्त टळला; सस्पेन्स कायम

विवेक कुलकर्णी

मुंबई, 13 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा होती. पण, उद्या ( शुक्रवारी ) मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची माहिती सुत्रांनी ‘न्यूज18 लोकमत’ला दिली आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स मात्र कायम आहे. पुढील आठवड्यामध्ये पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमिवर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा होती. पण, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स मात्र कायम आहे.

अधिवेशनात विरोधक – सत्ताधारी आमनेसामने

पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना रंगणार आहे. प्रकाश मेहता प्रकरणामध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केलेली असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले. त्यामुळे विरोधक काहीसे मागे पडल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.

तर, विरोध पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विरोधकांना हा मोठा धक्का आहे.

Loading...

ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आता शिवसेना – भाजप युतीनं विधानसभेसाठी देखील तयारी सुरू केली आहे.

विधानसभेसाठी 50-50 टक्के फॉर्म्युला

विधानसभेसाठी शिवसेना - भाजपनं 50-50 टक्के फॉर्म्युला ठरवला आहे. पण, केंद्रात मिळालेल्या केवळ एक मंत्रिपदानंतर शिवसेना नाराज आहे. शिवाय, मित्रपक्षांना देखील लोकसभेसाठी शिवसेना - भाजप युतीनं जागा दिल्यानं मित्रपक्ष देखील असमाधानी आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्रपक्षांना काय मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.SPECIAL REPORT: मालकाविना डेअरीमध्ये दूध पोहोचवणारा बैल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 11:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...