Home /News /news /

Maharashtra Budget Session: आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा, 'हे' मुद्दे गाजणार

Maharashtra Budget Session: आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा, 'हे' मुद्दे गाजणार

Maharashtra Budget Session: सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (state budget session) सुरु आहे. आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे.

    मुंबई, 07 मार्च: सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (state budget session) सुरु आहे. आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. आज सभागृहात पुन्हा एकदा अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. या आठवड्यात नवाब मलिक (Nawab Malik) , ओबीसी आरक्षण (OBC reservation) यासह अनेक मुद्दे गाजू शकतात. येत्या 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अशातच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारीत आहेत. अशातच सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना जशाच्या तसं प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, आज ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन आज विधिमंडळात विधेयक मांडलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत शुक्रवारी घोषणा केली होती. रशियानं युक्रेनच्या विमानतळावर डागली 8 मिसाईल, हल्ल्याचा Live Video विरोधी पक्षाच्या निशाण्यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आण अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आहेत. याआधी विरोधी पक्षानं महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. त्यामुळे आज अधिवेशनात सभागृहात मलिकांचा मुद्दा सर्वात जास्त गाजण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेले आरोप, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई, केंद्रीय यंत्रणांचा वापर या आणि अशा अनेक मुद्द्यांवर अधिवेशन गाजू शकतं. तर विरोधक राज्यातील विजेचा प्रश्न, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचं सुरु असलेलं आंदोलन यासह विविध मुद्द्यांवर कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Assembly session

    पुढील बातम्या