Maharashtra Board SSC Result 2020 : 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आज नाही लागणार निकाल

Maharashtra Board SSC Result 2020 : 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आज नाही लागणार निकाल

दहावीचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या निकालाचे अपडेट्स

  • Share this:

मुंबई, 27 जुलै: Maharashtra Board SSC Results 2020 महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार नाही अशी माहिती बोर्डातील सूत्रांकडून मिळाली आहे. आज निकाल लागण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू होती. मात्र बोर्डातील सूत्रांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दहावीचा निकाल लागायला काहीसा विलंब लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालाविषयी बोलताना या महिना अखेरीपर्यंत SSC चा निकाल लागेल, असं म्हटलं होतं.

या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल विद्यार्थी आणि पालक mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आणि यासोबतच न्यूज 18 लोकमतवरही हा निकाल पाहू शकणार आहेत. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे.

येत्या दोन दिवसांत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकही निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

वाचा-शिकण्यासाठी युवकाची धडपड, गावात रेंज नाही म्हणून रोज चढतो डोंगर

कसा पाहायचा निकाल

निकाल जाहीर झाल्यानंतर तो न्यूज 18 लोकमतवरही पाहायला मिळेल. त्यासाठी आपल्याला दहावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाई नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.

याशिवाय mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in यापैकी कोणत्याही संकेतस्थळावर भेट देऊ शकता. तिथे गेल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 27, 2020, 11:00 AM IST

ताज्या बातम्या