मराठा मोर्च्याची मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक

मराठा मोर्च्याची मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक

औरंगाबादध्ये काकासाहेब शिंदे तरुणाचा मृत्यूच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय.

  • Share this:

औरंगाबाद, 23 जुलै : औरंगाबादध्ये काकासाहेब शिंदे तरुणाचा मृत्यूच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय. मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. औरंगाबादमधून मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंद दरम्यान नागरिकांसह वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार याची काळजी घ्यावी अशी सुचनाही करण्यात आलीये.

आज दुपारी औरंगाबाद- अहमदनगर रोडवरील कायगाव इथं गोदावरी पात्रावरील पुलावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्क जलसमाधी आंदोलन केलं आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरी नदीत अर्पण केली आहे. या वेळी अपघात घडला काकासाहेब शिंदे नावाच्या तरूणाने नदीतच उडी घेतली. प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो त्यात वाहून गेला. नंतर त्या तरूणाला शोधण्यात यश मिळालं.त्याला काही मच्छीमारांनी पात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.

VIDEO : अरे तो बुडतोय,पण काकासाहेबाला वाचावला कुणीच आलं नाही !

मराठा समाज आक्रमक

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाने अनेक शांतीपूर्ण मार्गाने मूक मोर्चे काढून मराठा आरक्षणासाठी सरकारकडे शांततेच्या मार्गाने आरक्षणाची मागणी केली होती. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करून मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार कडून होत असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.

मराठा आंदोलन : नदीत उडी घेतलेल्या आंदोलकाचा मृत्यू

परभणीत जाळपोळ

तर दुसरीकडे परभणीतही मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पेटवलं आहे. गंगाखेडमध्ये 4 खासगी गाड्या, 5 बसेस, पोलिसांची व्हॅन आणि एक बस जाळण्यात आली आहे. या आंदोलनामुळे गंगाखेड परिसराला दंगलीचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे गंगाखेड बंदची हाक हिसंक वळणार नेण्यात आली असंच म्हणावं लागेल.

मराठा कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे 2 वार्ताहार जखमी झाले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आंदोलनात जखमी झालेल्यांना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर ठिकठिकाणी मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी राडा घातला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading