मुंबईच्या गुलाबी थंडीत विरोधक फोडणार सरकारला घाम!

मुंबईच्या गुलाबी थंडीत विरोधक फोडणार सरकारला घाम!

नोव्हेंबरपासून फक्त काही महिनेच मुंबईत आल्हाददायक वातावरण असंत. इतर वेळी घामाच्या धाराच असतात. मात्र विरोधीपक्ष या गुलाबी थंडीत सरकारला घाम फोडण्याच्या तयारीत आहे.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई, ता. 18 नोव्हेंबर : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून मुंबई सुरू होतंय. परंपरेप्रमाणं हिवाळी अधिवेशन हे नागपूरात होत असतं. मात्र अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच हे अधिवेशन मुंबईत होतंय. यावर्षी पावसाळी अधिवेशन नागपूरात पहिल्यांदाच झालं होतं. मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबतं, आमदारांची गैरसोय होते त्यामुळं पावसाळी अधिवेशन नागपूरात आणि हिवाळी अधिवेशन मुंबईत घ्यावं असा निर्णय झाला होता. त्यामुळं हिवाळी अधिवेशन  आता मुंबईत होतंय.

नोव्हेंबरपासून फक्त काही महिनेच मुंबईत आल्हाददायक वातावरण असंत. इतर वेळी घामाच्या धाराच असतात. मात्र विरोधीपक्ष या गुलाबी थंडीत सरकारला घाम फोडण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात 'ठगां'चे राज्य असून सत्ताधाऱ्यांनी राज्यातल्या जनतेला ठगवलं आहे असा थेट हल्ला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. तर दुष्काळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना गांभीर्य नाही अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलीय.

हे मुद्दे गाजणार?

मराठा आणि धनगर समाजाचं आरक्षण

मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटला?

शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळी स्थिती

ऊस, कापूस, सोयाबीनसह इतर पीकांच्या हमीभावाचा प्रश्न

अवनी वाघीणीला ठार मारल्याचं प्रकरण

राज्यातली बिघडणारी कायदा आणि सुव्यवस्था

उद्धव ठाकरेंची अयोध्या यात्रा आणि राम मंदिराचा प्रश्न

भाजप नेत्यांची बेताल वक्तव्य

'ठग्स ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाचा फिव्हर विधिमंडळाच्या अधिवेशनातही पडणार आहे. त्याचे संकेत रविवारी विरोधी पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बघायला मिळाले. राधाकृष्ण विखे पाटील सरकारवर टीका करताना म्हणाले, मुख्यमंत्री फक्त आश्वासने देतात.

त्यांच एकही आश्वासन पूर्ण होतं नाही. सरकारनं कर्जमाफी जाहीर केली. मात्र शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीने ती पोहोचली नाही. सरकारनं दुष्काळ जाहीर करायला विलंब केला. शेतकरी सरण रचून आत्महत्या करताहेत ही वेळ या सरकारनं आणली. त्यांनी जनतेला ठगवलं, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.

धनंजय मुंडे यांनीही टीका करताना अधिवेशन वादळी होण्याचे संकेत दिले. राज्यात दुष्काळ जाहीर होऊन 21 दिवस झाले पण दुष्काळाच्या कोणत्याही उपाययोजनेचा जीआर निघाला नाही. राम मंदिरासाठी अयोध्येला जाण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी भागाचा दौरा करायला हवा होता असा टोलाही त्यांनी लगावला.

तर धनगर समाजाचा अहवाल फुटत नाही , मराठा समाजाच्या अहवाल फुटतो म्हणजेच काही तरी काळबेरं आहे का? असा सवाल करत या अहवाल फुटीच्या विरोधात हक्कभंग मांडणार असण्याची घोषणा विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी केली.

First published: November 18, 2018, 4:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading