News18 Lokmat

राज्य सरकार म्हणजे 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' - विरोधकांचा हल्लाबोल

'राम मंदिरासाठी अयोध्येला जाण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी भागाचा दौरा करायला हवा होता'

News18 Lokmat | Updated On: Nov 18, 2018 04:51 PM IST

राज्य सरकार म्हणजे 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' - विरोधकांचा हल्लाबोल

मुंबई, ता. 18 नोव्हेंबर : महाराष्ट्रात 'ठगां'चे राज्य असून सत्ताधाऱ्यांनी राज्यातल्या जनतेला ठगवलं आहे असा थेट हल्ला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. तर दुष्काळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना गांभीर्य नाही अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलीय. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासू मुंबईत सुरू होतंय त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषद विखे पाटील, धनजंय मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाचा फिव्हर विधिमंडळाच्या अधिवेशनातही पडणार आहे. त्याचे संकेत रविवारी विरोधी पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बघायला मिळाले. राधाकृष्ण विखे पाटील सरकारवर टीका करताना म्हणाले, मुख्यमंत्री फक्त आश्वासने देतात. त्यांच एकही आश्वासन पूर्ण होतं नाही.


सरकारनं कर्जमाफी जाहीर केली. मात्र शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीने ती पोहोचली नाही. सरकारनं दुष्काळ जाहीर करायला विलंब केला. शेतकरी सरण रचून आत्महत्या करताहेत ही वेळ या सरकारनं आणली. त्यांनी जनतेला ठगवलं, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.


Loading...

धनंजय मुंडे यांनीही टीका करताना अधिवेशन वादळी होण्याचे संकेत दिले. राज्यात दुष्काळ जाहीर होऊन 21 दिवस झाले पण दुष्काळाच्या कोणत्याही उपाययोजनेचा जीआर निघाला नाही. राम मंदिरासाठी अयोध्येला जाण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी भागाचा दौरा करायला हवा होता असा टोलाही त्यांनी लगावला.


तर धनगर समाजाचा अहवाल फुटत नाही , मराठा समाजाच्या अहवाल फुटतो म्हणजेच काही तरी काळबेरं आहे का? असा सवाल करत या अहवाल फुटीच्या विरोधात हक्कभंग मांडणार असण्याची घोषणा विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी केली.


 







VIDEO : दुषित पाण्यावरुन रणकंदन; विरोधकांनी महापालिका सभागृहात फोडल्या घागरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 18, 2018 03:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...