Elec-widget

'होय, आमच्या बाबत घेवाण कमी आणि देवाणच जास्त झाली'

'होय, आमच्या बाबत घेवाण कमी आणि देवाणच जास्त झाली'

गेली पाच वर्षे महाराष्ट्रातील कारभार यशस्वीपणे हाकणारी युती एका बाजूला आणि फाटके-तुटके, गर्भगळित विरोधक दुसऱ्या बाजूला हे आजचे चित्र आहे. ‘युती’त दोन पक्षांची जास्तीत जास्त मुद्दय़ांवर सहमती आहे.

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर : युतीच्या जागावाटपात शिवसेनेला मिळालेल्या 124 जागांवर आज सामनाच्या अग्रलेखातून अधिकृत जाहीरच करण्यात आलं. जागावाटपात सव्वाशेच्या आसपास जागा मिळाल्या असून या देवाण घेवाणीत... शिवसेनेला यावेळी देवाणच जास्त झाली आहे आणि घेवाणीत जे मिळालं आहे तिथे शंभर टक्के यश मिळवणारच असा निर्धारही व्यक्तं करण्यात आलां आहे. तसंच राज्यात विरोधकांची अवस्था फाटकी-तुटकी अशी झाल्याची टिकाही सामनातून करण्यात आली आहे.

गेली पाच वर्षे महाराष्ट्रातील कारभार यशस्वीपणे हाकणारी युती एका बाजूला आणि फाटके-तुटके, गर्भगळित विरोधक दुसऱ्या बाजूला हे आजचे चित्र आहे. ‘युती’त दोन पक्षांची जास्तीत जास्त मुद्दय़ांवर सहमती आहे. तसे विरोधकांच्या बाबतीत सांगता येईल काय? रिंगणात उतरणे सोपे असते, पण रिंगणात टिकणे अवघड असते. आता मैदानही आमचे, रिंगणही आमचे आणि रिंगणात धावणारे विजयी अश्वही आमचे. युती झाली आहे, विजय पक्का आहे!

पुण्यात भाजपने सेनेला एकही जागा न सोडल्याने पक्ष पदाधिकारी सेना भवनाला अक्षरशः कुलूप घालून मातोश्रीवर जाऊन बसलेत. तर दुसरीकडे भाजपमध्ये चंद्रकांतदादांपाठोपाठ शिरोळे यांच्या घराणेशाहीलाही विरोध सुरू झाला आहे.

पुण्यात भाजपने शिवसेनेला एकही जागा न सोडल्याने सेना भवनाला हे असं भलं मोठं टाळं लागलंय. नाराज पक्ष कार्यकर्ते 'मातोश्री'वर जाऊन बसलेत शिवाजीनगरमधून उत्सुक असलेले माजी पोलीस भानू प्रताप बर्गे यांनी तर थेट अपक्षच लढण्याची घोषणा करून टाकली. शिवतारे मात्र, या पुणे शहर सेनेच्या या खच्चीकरणाबद्दल सरळ कानावर हात ठेवत आहेत.

Loading...

पुण्यात सेनेच्या कार्यालयाला अवकळा आलेली असताना तिकडे भाजपात मात्र, बंडखोरीला ऊत आला आहे. शिवाजीनगरमधून माजी खासदार अनिल शिरोळे यांना उमेदवारी जाहीर होताच काही भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय.

तर कोथरूडमध्येही चंद्रकांतदादांना होणारा विरोध काही केल्या कमी होताना दिसत नाही. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही स्वाभिमानीकडून आपल्याला उमेदवारीबाबत विचारणा झाल्याची फेसबुक पोस्ट टाकून आपलं नावं चर्चेत आणलंय. याउलट चंद्रकांतदादा मात्र, आपण पुणेकरांसाठी उपरे नसल्याचा दावा करत आहेत.

2009 साली पुण्यात कोथरूड आणि हडपसरमध्ये सेनेचे आमदार होते. त्यामुळे दोन मतदारसंघातून युतीबाबत तीव्र नाराजी आहे. त्यामुळे 'मातोश्री'कडून मूक संमती मिळाली तर कदाचित या दोन ठिकाणांहून नक्कीच सेनेचे इच्छूक बंडखोरी करू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 07:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...