पक्षानिष्ठेची एैशी-तैशी, तिकीट नाही मिळालं म्हणून अवघ्या 1 महिन्यात शिवसेनेतून घरवापसी!

पक्षानिष्ठेची एैशी-तैशी, तिकीट नाही मिळालं म्हणून अवघ्या 1 महिन्यात शिवसेनेतून घरवापसी!

भाजपाने पुसद मतदार संघातून विधान परिषदेचे आमदार निलय नाईक यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात आता दोन सख्खे चुलत भाऊ आमने सामने उभे ठाकले आहेत.

  • Share this:

पुसद, 03 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे उमेदवारीसाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने आयात नेते, इच्छुक कार्यकर्ते आणि विद्यमान आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. निवडणूकीत युती झाल्याने उमेदवारीसाठी पक्ष सोडून आलेले आता परत माघारी फिरत आहेत. गेल्याच महिन्यात पुसदचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मनोहरराव नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नसल्याने त्यांनी राष्ट्रवादीत पुनर्प्रवेश केला आहे.

भाजपाने पुसद मतदार संघातून विधान परिषदेचे आमदार निलय नाईक यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात आता दोन सख्खे चुलत भाऊ आमने सामने उभे ठाकले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीसाठी पोषक वातावरण नसतानाही मनोहरराव नाईक पुसद मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे नाईक यांनी शिवसेनेची वाट धरल्याने विदर्भात राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात होता. पण फक्त तिकीटासाठी गेलेल्या नेत्यांची अखेर घरवापसी झाली आहे.

भाजपमध्ये पहिली मोठी बंडखोरी; नाशिकमध्ये 14 नगरसेवकांचा राजीनामा

नाशिकमध्ये पूर्वच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच भाजपला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. पुण्यात कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्यासाठी तिकीट कापलेल्या आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात भाजपच्या नेत्यांना यश आलं असलं तरी नाशिकमध्ये मात्र विद्यमान आमदारांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. नाशिकमध्ये भाजपच्या 14 नगरसेवकांचा राजीनाम दिला आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातले विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी मिळावी यासाठी आमदारांनी राजीनामे दिले आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत आमदार सानप यांचं नाव नसल्याने समर्थकांनी दबाव टाकायला सुरुवात केली आहे.

इतर बातम्या - BREAKING: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, 20 जागांसाठी उमेदवार घोषित

गिरीश महाजनांच्या शिवनेरी बंगल्यावर सानप समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केलं होतं. आता 14 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. यात 8 महिला नगरसेवक आहेत. बाळासाहेब सानप यांच्या समर्थनार्थ दिला राजीनामा दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणखीही काही नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं समजतं.

पंचवटी परिसरात सानप समर्थकांनी गर्दी केली. मोठा पोलीस बंदोबस्त संध्याकाळी या परिसरात ठेवण्यात आला होता. समर्थकांची सानप यांच्या कार्यालयात मोठी गर्दी झाल्याने अतिरिक्त पोलीस कुमक दाखल झाली. बाळासाहेब सानप यांनी समर्थकांना सबुरीचं आवाहन केलं आहे.

इतर बातम्या - VIDEO : आदित्य ठाकरे लागले कामाला, वरळीकरांनी असं केलं स्वागत

दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करा, असं ते सांगत होते. 'पक्षावर माझा विश्वास आहे. कुठलंही टोकाचं पाऊस उचलू नका,' असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. मनसेतून भाजपमध्ये आलेले राहुल टिकले यांना तिकीट दिल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे समर्थकांची जमवाजमव सुरू झाल्याची बातमी आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2019 08:01 AM IST

ताज्या बातम्या