नवी मुंबई मनपा High Voltage मीटिंग, गणेश नाईकांच्या भूमिकेवर महाराष्ट्राचं लक्ष

नवी मुंबई मनपा High Voltage मीटिंग, गणेश नाईकांच्या भूमिकेवर महाराष्ट्राचं लक्ष

भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशा 56 नगरसेवकांना या बैठकीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्याता आली आहे. तर या बैठकीला संदीप नाईक आणि संजीव नाईकदेखील उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

विनय म्हात्रे, प्रतिनिधी

नवी मुंबई, 02 ऑक्टोबर : नवी मुंबईच्या बेलापूर मतदारसंघातून आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नुकतेच भाजपमध्ये गेले गणेश नाईक हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता गणेश नाईकांनी महापालिका नगरसेवकांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 12:30 वाजता महापौर बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीत गणेश नाईक काय निर्णय घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्रातचं लक्ष लागलं आहे.

भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशा 56 नगरसेवकांना या बैठकीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्याता आली आहे. तर या बैठकीला संदीप नाईक आणि संजीव नाईकदेखील उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  गणेश नाईकांना उमेदवारी न दिल्याने नाईक कुटुंब नाराज आहे. त्याच अनुषंगाने या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या बैठकीत नाईक कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

भाजपने विधानसभेसाठी पहिल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला. सगळ्यात जास्त कार्यकर्ते आणि कुटुंबासह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक यांना तिकीट मिळण्याची शक्यता असताना दिल्लीतून जाहीर केलेल्या यादीत त्यांच्या जागी मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली. बेलापूर मतदार संघातून आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे.

इतर बातम्या - उमेदवारी नाकारलेल्या भाजप कार्यकर्त्याचा संताप, पोस्टरवर लिहिलं...!

युतीच्या फॉर्मुल्यानुसार, नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदार संघ भाजपला देण्यात आले आहेत. यानुसार ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना उमेदवारी देण्यात आली. गणेश नाईक यांनी आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांसह राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 12 उमेदवारांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

इतर बातम्या - 'फक्त काही तास बाकी, वादळापूर्वीची शांतता'; नितेश राणेंच्या ट्वीटमुळे खळबळ

गेली 20 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेत गणेश नाईक यांनी एकहाती सत्ता ठेवली होती. 2015च्या मनपा निवडणुकीत त्यांना धक्का बसला. काँग्रेसची मदत घेत त्यांना पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा लावावा लागला. 2014च्या विधानसभा निवडणुकांमध्ये बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांचा पराभव केला होता. त्यावेळी त्या नवी मुंबईत किंग मेकर ठरल्या होत्या. खासदारकी, आमदारकी, महापौर आणि अशी अनेक पद घेऊन नवी मुंबईत उभ्या असलेल्या गणेश नाईक यांना 2014च्या लोकसभेत धक्का बसला.

इतर बातम्या - गणेश नाईकांबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य, भाजप मंत्र्यांचं मोठं विधान

गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांचा पराभव करत ठाण्यात राजन विचारे यांनी शिवसेनेचा झेंडा फडकावला. त्यानंतर झालेल्या विधानसभेत मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा पराभव केला. या दोन धक्कामुळे नवी मुंबईतील गणेश नाईकांच्या सत्तेला सुरुंग लागला अशा चर्चा होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 11:05 AM IST

ताज्या बातम्या