'पवार साहेब चांगले आहेत पण ते आता कुस्ती खेळू शकत नाहीत'

'पवार साहेब चांगले आहेत पण ते आता कुस्ती खेळू शकत नाहीत'

शरद पवार हे पूर्वी शक्तीशाली पैलवान होते पण आता फडणवीस आणि आम्ही शक्तीशाली आहोत असा घणाघात यावेळी रामदास आठवले यांनी केला आहे.

  • Share this:

पुणे, 16 ऑक्टोबर : पवार साहेब चांगले आहेत पण आता कुस्ती खेळू शकत नाहीत अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या घड्याळाचा काटा 10-10च्या पुढे जातच नाही. म्हणूनच पक्षाला गळती लागली असल्याचंही रामदास आठवले म्हणाले आहेत. शरद पवार हे पूर्वी शक्तीशाली पैलवान होते पण आता फडणवीस आणि आम्ही शक्तीशाली आहोत असा घणाघात यावेळी रामदास आठवले यांनी केला आहे. अगदी काही दिवसांवर विधानसभा निवडणुकांसाठी मतदान आलं असताना आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आहे ते राजकीय टोलेबाजी. त्यामुळे आता यावर राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, यावेळी आठवलेंनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीवरही त्यांच्या खास शैलीत टिपण्णी केली. 230 ते 240 जागा महायुतीच्या निवडून येतील. मला कँबिनेट मंञीपद मिळावं आणि चार महामंडळं मिळणार आहेत. खरंतर आम्ही नाराज होतो, पण आघाडीकडे जाऊन पण उपयोग नाही. पवार साहेब चांगले पण ते आता कुस्ती खेळू शकत नाहीत असं रामदास आठवले म्हणाले आहेत. ते एका आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

इतर बातम्या - आर्थिक वादातून पुण्यात रॉड आणि तलवारीने मारामारी, पाहा अंगावर शहारे आणणारा CCTV

पत्रकार परिषदेतील रामदास आठवले यांचे महत्त्वाचे मुद्दे...

- 6 डिसेंबर 2020 पर्यंत इंदू मिल स्मारकाचे काम पूर्ण होईल

- भाजप सेनेचा जाहीरनामा एकच असायला पाहिजे होता

- थाळी 8 रूपये असायला पाहिजे होती. असेल दोघांची थाळी, तरी मी वाजवतो टाळी

- मोदी देशाबाहेर जाऊन सगळ्यांशी दोस्ती करताहेत पण राहुल गांधींना ते जमत नाही.

- विरोधकांना एवढ्या कमी जागा मिळतील की विरोधी पक्ष नेताच कोणी होऊ शकणार नाही. वंचितचा किंचीतही परिणाम होणार नाही.

- राज ठाकरे भाषण चांगलं करतात पण त्यांच्या जागा निवडून येणार नाहीत

- रिपाई(A) ला कम्प्युटर हे सिंबल मिळालेलं आहे

इतर बातम्या - उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतरही अभिनेत्याने दिल्या आदित्यला शुभेच्छा, VIDEO व्हायरल

- आमचे लोक कमळावर निवडून आले तरी आमचा गट स्वतंत्रच राहील.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पैलवान टीकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी जोरदार पलटवार केला होता. त्यांच्या या टीकेवर रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 12:31 PM IST

ताज्या बातम्या