बीडच्या राजकारणात डोनाल्ड ट्रम्प गाजतोय, मुंडे भाऊ-बहिणीत खडाजंगी!

बीडच्या राजकारणात डोनाल्ड ट्रम्प गाजतोय, मुंडे भाऊ-बहिणीत खडाजंगी!

राष्ट्रवादीने विकासासाठी फुटकी कवडीदेखील दिली नाही असा घणाघात भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केला.

  • Share this:

बीड, 16 ऑक्टोबर : परळी मतदारसंघात कोट्यवधीचा निधी देऊन रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, बचतगट भवन, महिलांचे सक्षमीकरण हे सगळं केलं, विकासाची कामे केली तरीही राष्ट्रवादी म्हणते विकास कुठे यांच्या  डोळ्याला विकास दिसत नाही. डोळ्यात बीब्बा पडला? असा खडा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. तसंच परळीकरांनी आशीर्वाद दिला माझा सन्मान वाढवला तर डोनाल्ड ट्रम्पला घेवून येईल. असा विश्वास व्यक्त करत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेवर निशाणा साधला. त्या परळी मतदारसंघात सिरसाळा इथल्या सभेत बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ प्रितम मुंडे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणल्या की, विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत. तुमचे पक्षाचे सर्वोच्च नेते सारखे-सारखे बीडमध्ये येतात. जेवढे राजकारण केले त्याच्या 10 टक्केही विकास केला नाही. सत्ता असताना राष्ट्रवादीने विकासासाठी फुटकी कवडीदेखील दिली नाही असा घणाघात भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना आपल्या भागाच्या विकासासाठी फुटकी कवडीही दिली नाही आणि आता विकासाच्या गप्पा मारून मत मागत आहेत. मत मागण्याचा यांना नैतिक अधिकार तरी आहे का? असा सवाल करून सत्तेच्या केवळ भ्रष्टाचार करून जनतेला वाऱ्यावर सोडणारांना धडा शिकवून विकासाला गती देण्यासाठी मला आशीर्वाद द्या असं आवाहन  पंकजा मुंडे यांनी केलं.

इतर बातम्या - 'हल्लेखोराला जीव घ्यायचा होता'; चाकूहल्ल्यानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया

भाजप आमदार पुत्राचा भर सभेत पाणउतारा, सभा गुंडाळून घ्यावा लागला काढता पाय

आमदारांच्या कामाचा पंचनामा करताना बऱ्याच वेळा लोक आक्रमक होतात. नेते फक्त निवडणुकीच्या काळातच भेटीला येतात, निवडून आले की फिरकतही नाहीत हा अनुभव बऱ्याच वेळा मतदारांना येतो. असाच अनुभव आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांच्या मुलाला आला. तुम्ही कधी गावकऱ्यांना योग्य मदत करत नाही त्यामुळे उगाच तुम्ही गावकऱ्यांना काही शिकवू नका असं सांगत लोक आक्रमक झाले आणि आमदार पुत्राला सभेतून काढता पाय घ्यावा लागला. त्याचं घडला असे की मतदारसंघातिल शिरूर कासार तालुक्यातील टेंभुर्णी येथे कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

इतर बातम्या - 'पवार साहेब चांगले आहेत पण ते आता कुस्ती खेळू शकत नाहीत'

सभेसाठी आमदाराचे सुपुत्र अजय धोंडे उपस्थिती होते यावेळी सभा सुरु होताच अजय धोंडे यांनी गावातले लोक राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहे आजबे यांना मदत करत असल्याबद्दल नाराजीचा सूर व्यक्त केला. तुम्ही मुंडे साहेबांचं, पंकजाताईंचं काम केलं पाहिजे असा आग्रह केला. आमदार पुत्रांच्या या वक्तव्याने लोक चांगलेच भडकले. एका कार्यकर्त्याने उभे राहून त्यांच्याशी वाद घालायला सुरूवात केली.

गोपीनाथ मुंडे असताना धोंडे हे काँग्रेसमध्ये होतो. तोच धागा पकडत त्या कार्यकर्त्याने त्यांना चांगलंच सुनावलं. तो म्हणाला, बाळासाहे आजबे काका कसेही असो पण त्यांनी मुंडे साहेब यांना कधी विरोध केला नाही की त्रास दिला नाही. उलट तुम्हीच त्यांना त्रास दिला. आजबे आम्हाला मदत करतात. मात्र तुम्ही हात आखडता घेता.

इतर बातम्या - BREAKING : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ला, प्रचार सभेत हातावर वार!

गावात धार्मिक सप्ताह असो की कुठला कार्यक्रम तुम्ही पैसे थोडे देता आणि जास्त चकरा मारायला सांगता. कार्यकर्त्यांच्या या बोलण्यावर अजय धोंडे समर्थक त्या प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला  धक्के देत बाहेर काढण्यासाठी पुढे आले. मात्र त्यानंतर गावकरी अधिकच आक्रमक झाले. लोकांना बोलू द्या, त्याचा अधिकार आहे असं म्हणतं सभेत गोंधळ सुरू झाला. परिस्थिती अनुकूल नाही असं दिसल्याने आमदार पुत्रांने सभेतून काढता पाय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 01:56 PM IST

ताज्या बातम्या