उद्या उमेदवारी अर्जासाठी शेवटचा दिवस; निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या तारखा

उद्या (4 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि त्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या तारखा एका क्लिकवर

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2019 10:08 PM IST

उद्या उमेदवारी अर्जासाठी शेवटचा दिवस; निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या तारखा

मुंबई, 3 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून उद्या (4 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision of India) महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली तेव्हा महत्त्वाच्या तारखांची घोषणा केली. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि त्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे -

अधिसूचना - 27 सप्टेंबर.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - 4 ऑक्टोबर

उमेदवार अर्ज छाननी - 5 ऑक्टोबर

Loading...

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख - 7 ऑक्टोबर

मतदान - सोमवार 21 ऑक्टोबर

मतमोजणी - गुरुवात 24 ऑक्टोबर

ही आहे तयारी

निवडणूक आयोगाचं विधानसभा निवडणुकीवर होणाऱ्या खर्चाकडे बारीक लक्ष आहे.

वाचा - अडीच कोटींच्या कारमधून फिरतो या नेत्याचा नातू, वयापेक्षा जास्त कोटींची संपत्ती

कोण उमेदवार किती खर्च करतो, प्रचारासाठी कोण किती खर्च करतो याकडे आयोगाचं लक्ष आहे. प्रत्येक उमेदवाराला खर्चाचा तपशील देणं बंधनकारक आहे. उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षक पाठवण्यात आले आहेत. 2 नोव्हेंबरपूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दोन्ही राज्यांसाठी या तारखा महत्त्वाच्या आहेत.

2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात कुणाला किती जागा?

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

वाचा - WhatsAppवर राजकीय कॉमेंट करताना सावधान, पोलिसांनी बजावल्या 68 Group Adminना नोटीसा

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचं सरकार स्थापन केलं.

2014 ची परिस्थिती

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

काय आहे हरियाणातील स्थिती?

हरियाणामध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. हरियाणात मागील निवडणुकीत 90 पैकी 47 जागांवर भाजपने विजय मिळवला होता आणि मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar)यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 10:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...