शरद पवारांना गरीबी काय माहीत, अमित शहांचा घणाघात

राहुल गांधी, शरद पवार यांच्यावर 370च्या भुमिकेवरुन टीका केली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत 370कलमचं काय काम? या प्रश्नांवरुन अमित शहा यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2019 01:40 PM IST

शरद पवारांना गरीबी काय माहीत, अमित शहांचा घणाघात

नंदुरबार, 19 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास उरले आहेत. या शेवटच्या दिवशी प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. बहुतेक सगळे उमेदवार आपापल्या मतदारसंघात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यादेखील आज राज्यात सभा आहे. दरम्यान, नंदुरबारच्या सभेमध्ये अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. नवापुर मतदारसंघात आजतागायत एकदाही भाजपाचा विजय न झाल्यानेच मुद्दाम याठिकाणी प्रचार सभा घेतली.

राहुल गांधी, शरद पवार यांच्यावर 370च्या भुमिकेवरुन टीका केली आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत 370कलमचं काय काम? या प्रश्नांवरुन अमित शहा यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे. 'कलम ३७० उखडुन फेकण्याचे काम मोदी सरकारने केले. कलम 370च्या माध्यमातुनच पाकीस्तानने काश्मीरमध्ये आंतकवाद पसरवला. पण वोट बँकच्या चिंतेने काँग्रेसने 370 हटवण्यास विरोध केला. हिम्मत असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आल्यास 370परत लागू करा अशी घोषणा करा. बघा महाराष्ट्रातील जनता तुमचे काय हाल करते' अशा शब्दात अमित शहा यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

अमित शहा यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे...

- शौचालयाला विकास न म्हणानाऱ्या शरद पवारांना गरीबी काय माहीती  नाही.

- राज्यात भाजपाचे सरकार आल्यास पाच वर्षात महाराष्ट्राला क्रमांक 1 चं राज्य बनवणार

Loading...

- भाजपा सरकारने प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेतून 2 हजार कोटी रुपये दिले

- आकांक्षीत जिल्ह्याच्या माध्यमातून आदिवासी बहुल मागास जिल्ह्याचा विकास काम सुरू

- काँग्रेसने 60 वर्षात ओबीसींसाठी काहीच केले नाही. राष्ट्रीय पिछडा आयोगच्या माध्यमातून भाजपाने ओबीसींना न्याय दिला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...