राज्यात सत्ता स्थापनेचे शिल्लक आहेत फक्त हे 6 पर्याय!

राज्यात सत्ता स्थापनेचे शिल्लक आहेत फक्त हे 6 पर्याय!

एकीकडे राज्यात भाजप शिवसेना महायुतीचच सरकार येणार आहे असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला असून सेनेनं कोणताही प्रस्ताव पाठवलेला नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे.

  • Share this:

मुंबई, 05 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यात सत्ता संघर्ष सुरू झाला आहे. सत्तेसाठीच्या या वादामध्ये नागरिकांमध्ये मात्र संभ्रम वाढत आहे. त्यामुळे आता सत्ता कोण स्थापन करणार आणि कोणाचा मुख्यमंत्री असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. एकीकडे राज्यात भाजप शिवसेना महायुतीचच सरकार येणार आहे असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात आला असून सेनेनं कोणताही प्रस्ताव पाठवलेला नसल्याचं भाजपचं म्हणणं आहे. तर लोकसभेत ठरल्याप्रमाणेच होईल असं सेनेकडून ठाम सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विधानसभेत कोणाची सत्ता स्थापन होणार यावर आता जोरदार चर्चा सुरू आहे.

सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षाने बहुमत सिद्ध करणं महत्त्वाचं आहे. यावर शिवसेना आणि भाजपकडूनही आम्ही बहुमत सिद्ध करू असा दावा करण्यात आला आहे. तर शिवसेनेकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. आमच्या मनात कुठलीही शंका नाही असंही पाटील म्हणाले. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. संसदीय मंडळानेही त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं असंही त्यांनी स्पष्ट केलं. या सगळ्यावर आता शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

इतर बातम्या - जास्तीची एक काडीही नको, भाजपच्या बैठकीनंतर शिवसेनेचं थेट उत्तर

सत्ता स्थापन करण्यासाठी महत्त्वाच्या पक्षांचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्यात सत्ता स्थापनेचे काही पर्याय आहेत. या 6 पर्यांयाशिवाय सत्ता स्थापनेला कोणताही मार्ग नाही असं चिन्ह आहे. जाणून घेऊयात काय आहेत 6 पर्याय...

1)सगळ्यात पहिला पर्याय म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष आणि दुसरा मोठा पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना युतीमध्ये सरकार स्थापन करेल.

2)दुसरा पर्याय म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपने सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर 15 दिवसांत बहुमत सिद्ध करावं.

3)तिसरा पर्याय असा की बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने इतर पक्षातील आमदारांचा पाठिंबा मिळवावा. भाजपने जर सेनेचे आमदार फोडले तर ते सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत सिद्ध करू शकतात.

इतर बातम्या - शिवसेना सोबत नाही आली तर हा असू शकतो भाजपचा प्लान 'बी'

4)फडणवीस सरकार जर बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी अपयशी ठरलं तर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना सत्ता स्थापन करू शकते. पण त्यासाठी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्याची गरज आहे.

5)शिवसेनेलाही जर बहुमत गाठता आलं नाही तर तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीने बहुमत सिद्ध करणं महत्त्वाचं आहे. यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसचा पाठिंबा आणि शिवसेनेचा बाहेरून पाठिंबा महत्त्वाचा आहे.

6)अखेर जर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही बहुमत सिद्ध करण्यात आलं नाही तर सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणजे राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 08:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading