ठाकरे, पवार, मुंडे, चव्हाण, महाराष्ट्राच्या VIP जागेंचा काय आहे Exit Poll?

महाराष्ट्रात काही महत्त्वाच्या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा, वरळी, परळी, शिर्डी, येवला, लातूर, भोकर, बारामती या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2019 09:01 PM IST

ठाकरे, पवार, मुंडे, चव्हाण, महाराष्ट्राच्या VIP जागेंचा काय आहे Exit Poll?

मुंबई, 21 ऑक्टोबर : News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत भाजप- शिवसेना महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील, असं या  Exit Poll चा निकाल सांगतो. या पोलनुसार, महाराष्ट्रात काही महत्त्वाच्या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा, वरळी, परळी, शिर्डी, येवला, लातूर, भोकर, बारामती या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामध्ये कोणी कशी बाजी मारली आहे पाहुयात...

वरळी मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच निवडणुकांच्या रिंगणात उतरणारे आदित्य ठाकरे हे जिंकण्याची शक्यता आहे. तर इथे आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. हाती लागलेल्या Exit Poll नुसार वरळी मतदारसंघामध्येआदित्य ठाकरे बाजी मारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पहिल्यांदाच विधानसभेत उमेदवारी मिळवणारे आदित्य ठाकरे बाजी मारणार आहेत. खरंतर वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

परळीमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा पराभव केला आणि त्या मंत्री झाल्या होत्या. आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंकजा मुंडे यांचं पारडं जड असल्याचं सांगण्यात येत आहे. तर धनंजय मुंडेंचा पराभव होणार आहे. परळी मतदारसंघ सगळ्यात जास्त गाजला तो मुंडे भाऊ-बहिणींमध्ये. दोघांमध्येही कठोर टक्कर पाहायला मिळते. पण अशात धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर बातम्या - MIM चे खासदार जलील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भररस्त्यावर धक्काबुक्की

येवल्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर छगन भुजबळांचं मॅजिक चाललं आहे. येवला-लासलगाव मतदारसंघात छगन भुजबळ विजयी चौकार लगावणार असल्याचं चित्र आहे. छगन भुजबळ आणि येवला मतदारसंघ हे अनेक वर्षांचं समीकरण आहे. पैठणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवला - लासलगाव मतदारसंघातून छगन भुजबळ हे सलग तीन वेळा निवडून आले. यावेळी मात्र त्यांच्याच पक्षातले माणिकराव शिंदे यांनी त्यांना उमेदवारीसाठी आव्हान दिलं आहे. 2009 मध्ये छगन भुजबळांचे समर्थक माणिकराव शिंदे यांनी भुजबळांची साथ सोडून शिवसेनेत गेले. त्यांना शिवसेनेने उमेदवारी मिळाली दिली पण या निवडणुकीत छगन भुजबळच निवडून आले.

Loading...

या निकालानुसार, राधाकृष्ण विखेपाटील हे बाजी मारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुरेश थोरात यांच्यात लढत आहे. खरंतर राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाचा महाआघाडीला धक्का बसला असं म्हणायला हकरत नाही. शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील आणि सुरेश थोरात यांच्यात लढत आहे. इथे विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यातली सत्तास्पर्धा पाहायला मिळतेय.  सुरेश थोरात हे बाळासाहेब थोरात यांचे चुलतभाऊ आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीने जागा सोडू नये, ही भूमिका बाळासाहेब थोरात यांनी घेतली, असा विखे पाटील यांचा आरोप आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीतून सातव्यांदा निवडणूक लढवतायत. आतापर्यंत ते इथे एकदाही पराभूत झालेले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या - साताऱ्यात राजे अडचणीत? पाहा EXIT POLL चा अंदाज

राज्यातील मुख्य लढती पैकी लातूरची लढत महत्त्वाची मानली जात आहे. लातूर शहर आणि ग्रामीणमधून देशमुख कुटुंबातून अमित आणि धीरज देशमुख निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. परंतु, एका भावासाठी गोड बातमी तर दुसऱ्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे.

बारामतीमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी निवडणूक अवघड आहे, असा न्यूज 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज आहे. अजित पवार यांच्याविरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली. गोपीचंद पडळकर हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये आले आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी थेट अजित पवार यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली. त्यामुळे बारामतीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, भोकर विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना धक्का बसणारअसल्याचं  Exit Poll पोलमधून समोर आलं आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयी, कराड दक्षिण मधून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव तर कोथरूड मतदारसंघामधून भाजपचे चंद्रकांत पाटील बाजी मारणार असल्याचा निकाल EXIT POLLने दिला आहे.

इतर बातम्या - 6 EXIT POLL; 6 अंदाज : कुठल्या पोलने दिल्यात काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा?

2019 मतदानोत्तर चाचणी

भाजप - 141

सेना - 102

काँग्रेस - 17

राष्ट्रवादी - 22

MIM - 01

मनसे - 01

इतर  - 02

अपक्ष - 03

मागील विधानसभेत काय होती स्थिती?

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेलाही समाधानकारक जागा मिळाल्या होत्या.

इतर बातम्या - छगन भुजबळांसह कुटुंबीयांनी मतदानाकडे फिरवली पाठ.. सर्वत्र 'ही' चर्चा सुरू

या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावली. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

2014 महाराष्ट्र विधानसभेची स्थिती

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 09:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...