शरद पवार Vs अमित शहा, महाराष्ट्रात आजचा दिवस 'हाय व्होल्टेज'

शरद पवार Vs अमित शहा, महाराष्ट्रात आजचा दिवस 'हाय व्होल्टेज'

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेतृत्वाकडून शरद पवार यांना लक्ष्य केलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील राज्यभर फिरत असून त्यांची नागपूर जिल्ह्यात सभा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेतृत्वाकडून शरद पवार यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आज जाहीर सभांमधून कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज मुंबईत दोन सभा होत आहेत. सांताक्रूझ आणि गोरेगाव इथं राज ठाकरेंच्या प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज ठाकरे हे आज सकाळी कसबा गणपतीची आरती केल्यानंतर सभेसाठी रवाना होतील. बुधवारी पुण्यातील राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा पावसामुळं रद्द करण्यात आली होती. जोरदार पाऊस झाल्यामुळं सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळं अखेर ही सभा रद्द करावी लागली.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यातील जत शहरातील आर आर कॉलेजच्या मैदानावर त्यांची 12 वाजता सभा जाहीर सभा होणार आहे. भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार असून या सभेची सांगली भाजपनं जय्यत तयारी केली आहे.

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून पहिल्यांदाच शहा हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. ही सभा झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, तुळजापूर आणि लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथंही अमित शहा यांच्या सभा होणार आहेत.

कुणाची कुठे होणार सभा?

Loading...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात प्रचारसभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातारा, सोलापूर जिल्ह्यात प्रचारसभा

उद्धव ठाकरेंची औरंगाबाद इथं प्रचारसभा

शरद पवार हे नागपूर जिल्ह्यात प्रचारसभा करणार- बुट्टीबोरी, हिंगणा

राज ठाकरेंच्या सांताक्रूझ आणि गोरेगाव इथं प्रचारसभा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुंबई, परभणी, जळगाव येथे प्रचारसभा

भाजप कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भोकर, नांदेड इथं प्रचारसभा

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 09:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...