पंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार

पंढरपुरातून हा ज्येष्ठ नेता मैदानात.. भाजपने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार

भाजपने तिकीट दिले नाही तरी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आपण अपक्षही लढण्यास तयार असल्याचे सुधाकर परिचारक यांनी जाहीर केले.

  • Share this:

वीरेंद्रसिंग उत्पात,(प्रतिनिधी)

पंढरपूर,21 सप्टेंबर: पांडुरंग परिवाराच्या बैठकीत ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकर परिचारक यांना विधानसभा निवडणुकी उमेदवारी देण्याचा ठराव करण्यात आला आहे. भाजपने तिकीट नाकारले तर सुधाकर परिचारक यांनी अपक्ष लढावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. सुधाकर परिचारक यांनीही कार्यकर्त्यांच्या या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

भाजपने तिकीट दिले नाही तरी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आपण अपक्षही लढण्यास तयार असल्याचे सुधाकर परिचारक यांनी जाहीर केले. शनिवारी पांडुरंग परिवाराची बैठक झाली. यात परिचारक कुटुंबातील कोणीही विधानसभा लढवावी, अशी मागणी करण्यात आली. भाजपाचे तिकीट मिळाले नाही तरी निवडणूक लढविण्याचा आग्रह कार्यकर्ते, पदाधिकारी, नगराध्यक्षांनी यावेळी परिचारकांना केला. यासंदर्भात पांडुरंग परिवाराचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईत जाणार आहेत.

दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या आवारात शहर व ग्रामीणची बैठक होणार आहे. या बैठकीत सुधाकर परिचारक काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीचा बिगुल वाजला...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला एका टप्प्यात मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

असा आहे विधानसभा निवडणूक कार्यक्रम..

- अर्ज भरण्याची तारीख : 27 सप्टेंबर

- अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर

- अर्ज छाननी : 5 ऑक्टोबर

- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 7 ऑक्टोबर

- मतदानाची तारीख : 21 ऑक्टोबर

- निकाल : 24 ऑक्टोबर

असे आहे 2014 मधील पक्षीय बलाबल..

- भाजप - 122 जागा

- शिवसेना - 63 जागा

- काँग्रेस - 42 जागा

- राष्ट्रवादी काँग्रेस - 41 जागा

- इतर - 20 जागा

- एकूण - 288 जागा

VIDEO:सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया

Published by: Sandip Parolekar
First published: September 21, 2019, 9:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading