पैशांचा खेळ सुरू.. आयकर विभागाने जप्त केली 29 लाख 15 हजार रुपयांची रोकड

पैशांचा खेळ सुरू.. आयकर विभागाने जप्त केली 29 लाख 15 हजार रुपयांची रोकड

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राज्यात आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. प्रचार तोफा तापण्याआधीच पैशांचा खेळ सुरू झाला.

  • Share this:

इम्तियाज अहमद,(प्रतिनिधी)

भुसावळ,9 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राज्यात आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. प्रचार तोफा तापण्याआधीच पैशांचा खेळ सुरू झाला. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या चोरवड चेक पोस्ट नाक्यावर फिरत्या वाहन तपासणी पथकाने एका बसमधील प्रवाशांकडून तब्बल 29 लाख 15 हजार रुपयांची रोकड जप्त केली.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी केली जात रावेरचे प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी माहिती दिली. याच अनुषंगाने फिरत्या वाहन तपासणी पथकाकडून महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या चोरवड चेक पोस्ट वर मध्यप्रदेशमधील बऱ्हाणपूरकडून रावेरकडे येणाऱ्या मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या बसमधून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

मोहम्मद शाहजाद असे या व्यक्तीचे नाव आहे. पथकाने त्याच्या बॅगेतून 29 लाख 15 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. मोहम्मद शाहजाद हा मध्यप्रदेशातील खंडवा येथील रहिवासी आहे. निवडणूक विभागाकडून या प्रवाशाची कसून चौकशी सुरू आहे. ही रोकड भुसावळ येथील व्यापार्‍याला देण्यासाठी जात असल्याची माहिती शाहजाद यांनी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये ही मोठी कारवाई मानले जाते.

भिवंडीत भरारी पथकाने जप्त केली 20 लाखांची रोकड

दरम्यान, गेल्या आठवड्यात भिवंडीत आचारसंहिता पथकाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीत एका कारमधून 20 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली होती. विशेष भरारी पथकाचे प्रमुख नाना झळके यांच्या पथकाने वाहन पथकामार्फत साईबाबा नाक्यावर ही कारवाई केली. काही आठवड्यांपूर्वीच या पथकांनी भिवंडीत 10 लाखांची रक्कम जप्त केली होती.

निवडणुका म्हटल्या की खर्च आला आणि खर्च करायचे म्हटले की पैसे पाहिजे. निवडणुका या पैशांचा खेळ झाल्याचा आरोप वारंवार करण्यात येतो. सर्वाधिक पैसे खर्च केले जातात ते निवडणुकीच्या काळात. प्रत्येक निवडणुकीत कोट्यवधींची रक्कम जप्त केली जाते. त्याचे आकडे पाहिले तरी डोळे विस्फरून जातात. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत होणारा पैशांचा खेळ रोखण्यासाठी आयकर विभागाने कंबर कसलीय. निवडणुकीच्या काळात काळ्या पैशाची देवाण-घेवाण होत असते. अश्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आयकर विभागाणे शिघ्र कृती दलाची स्थापना केली आहे.

राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या क्विक रिस्पॉन्स टीम सोबतच आयकर विभागाणे कंट्रोल रूम देखील तयार केली आहे. काळ्या पैश्याची देवघेवाण करताना कुणाला आढळल्यास नागरिकांनी कंट्रोल रूम ला त्याची माहिती द्यावी, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा प्रत्येक उमेदवाराला ही 28 लाख रुपये येवढी आहे. ती मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी केली जातेय. निवडणूक आयोगाने घेतलेल्या बैठकींमध्ये अनेक राजकीय पक्षांनी ही मर्यादा 40 लाखांपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी केली होती. मात्र आयोगाने ही मर्यादा वाढवून दिली नाही.

बालेकिल्ल्यात पार्थबद्दल अजित पवारांची घेतला निर्णय, पाहा हा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: October 9, 2019, 9:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading