प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बीडमध्ये दिले 'राष्ट्रवादी'च्या गळतीवर हे उत्तर

राष्ट्रवादी सोडून जे जे नेते गेले त्यांच्या भानगडी विधानसभा निवडणुकीत सांगतो. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांमुळे राष्ट्रवादी पक्ष स्वच्छ व्हायला लागला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 02:26 PM IST

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बीडमध्ये दिले 'राष्ट्रवादी'च्या गळतीवर हे उत्तर

बीड, 26 ऑगस्ट- काही जण ईडीला घाबरून गेले, काहीजण बेडीला घाबरून गेले तर काहीजण "सीडी "ला घाबरून गेले. ज्यांच्या मागे चौकशी लागली ते जाताय. ज्यांचा घोटाळा असेल तो जातोय. दमदाटीला घाबरणारे जात आहेत, छत्रपतीच्या विचाराने आणि ताकदीने चालणारा एकाही मावळा शरद पवार साहेबांना सोडून जात नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतील गळतीवर उत्तर दिले. धनंजय मुंडेनी सीडी असे सुचवले यावेळी "सीडीचे" नाव काढताच सभेत मोठा हश्या पिकला.

बीडमध्ये शिव स्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ.अमोल कोल्हे, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार सतिष चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासह हजारो लोक सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी सोडून जे जे नेते गेले त्यांच्या भानगडी विधानसभा निवडणुकीत सांगतो. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांमुळे राष्ट्रवादी पक्ष स्वच्छ व्हायला लागला आहे. घाबरट लोकांपेक्षा तरुण राष्ट्रवादीत येत आहेत. त्यांना सोबत घेऊन पवार साहेबांच्या विचारातून नवा महाराष्ट्र घडवू, असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला आणखी एक धक्का...

दरम्यान, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभेतील उमेदवार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहेत.

Loading...

लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना कोल्हापूरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीसह काँग्रेसमधीलही स्थानिक नेत्यांचा विरोध होता. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय महाडिक यांच्या पारड्यात आपलं मत टाकत त्यांना उमेदवारी दिली. देशातील मोदी लाट आणि काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी विरोधात केलेलं काम यामुळे महाडिकांना मोठा पराभव सहन करावा लागला.

धनंजय महाडिक सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. महाडिक यांच्या भाजप प्रवेशाची तारीख उद्या निश्चित होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच आता कोल्हापूरमधील ताकदवान नेता सोडून जात असल्याने राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसणार आहे.

दरम्यान, धनंजय महाडिक यांनी आतापर्यंत 2 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. महाडिक यांनी मे महिन्याच्या अखेरीस भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली होती. तेव्हाच धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्यानंतर धनंजय महाडिक यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळली होती.

'साखर कारखान्यांच्या कामासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन दिलं जाणार आहे. पण काही कारखान्यांना या योजनेत स्थान देण्यात येणार नव्हतं. यासंदर्भातच मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. आजही अनेक कारखानदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. मी भाजपमध्ये जाणार ही अफवा आहे. भविष्यातही मी राष्ट्रवादीच राहणार आहे,' असा दावा तेव्हा महाडिक यांनी केला होती. पण आता विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच महाडिक भाजपमध्ये प्रवेश करणार, हे निश्चित समजलं जात आहे.

VIDEO: विरोधकांनी वाईट शक्तींचा वापर केल्यानं भाजपच्या नेत्यांचा मृत्यू, साध्वी प्रज्ञा पुन्हा बरळल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 02:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...