'बाप सरदार असला म्हणून मुलगा सरदार व्हायला पाहिजे असं काही नसतं'

'बाप सरदार असला म्हणून मुलगा सरदार व्हायला पाहिजे असं काही नसतं'

आपल्या अडचणीत साथ देतो त्याला आपण साथ द्यायची की वरून आलेले पार्सल आपण डोक्यावर घेऊन मिरवायचं याचाही विचार मतदारांनी करावा...

  • Share this:

चंद्रकांत बनकर,(प्रतिनिधी)

खेड(रत्नागिरी),21 सप्टेंबर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या शिव स्वराज्य यात्रेचे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे या दोघांनीही यावेळी शिवसेनेला टार्गेट केले.

बाप सरदार असला म्हणून त्याचा मुलगा सरदार व्हायला पाहिजे, असे काही नसतं, काळाच्या पुण्याईवर आजचा दिवस स्वराज्यात उगवत नव्हता. त्या छत्रपतींची ही भूमी आहे, अशा खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर घणाघाती टीका केली.

दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम हे संभाव्य उमेदवार आहे. मतदारांनी याची काळजी करू नये, राष्ट्रवादीच्या वतीने मी शब्द देतो संजय कदम यांना निवडून द्या, मंत्री मंडळातील कदम स्थान आपण जाऊ देणार नाही, आमच्याकडून भास्कर जाधव गेलेत, सुनील तटकरे दिल्लीत आहेत. त्यामुळे संजय कदम यांना मंत्री बनण्यासाठी स्कोप असल्याचे त्यांनी संगितले.

भास्कर जाधवांनी आधी बोलायला हवं होतं- जयंत पाटील

जयंत पाटील यांनी सांगितले की, भास्कर जाधव आपले जवळचे मित्र होते. ते का जातायत याबाबत त्यांनी आधी आपल्याला बोलायला हवं होतं. ते पक्ष सोडून का गेले याचं कारण आपल्यालाही समजले नाही.

शिवसेनेने कोकणाला काय दिलं?

काळाच्या पुण्याईवर आजचा दिवस स्वराज्यात उगवत नव्हता. त्या छत्रपतींची ही भूमी आहे. खेडवासियांनी याचा विचार करावा. आपल्या अडचणीत साथ देतो त्याला आपण साथ द्यायची की वरून आलेले पार्सल आपण डोक्यावर घेऊन मिरवायचं याचाही विचार मतदारांनी करावा, असे बोलून रामदास कदम यांचे चिरंजीव आणि दापोली मतदार संघातून सेनेचे संभाव्य उमेदवार योगेश कदम यांच्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली.

शिवसेनेने कोकणाला काय दिलं, हा सवाल या निवडणुकीत त्यांना विचारा, या मतदार संघात बाराशे कोटींची विकास कामे आणली, असे शिवसेनेचे मंत्री म्हणतात, हे जनतेला मान्य आहे का, असा प्रश्न शिवसेनेला विचारावा, असे आवाहनही खासदार कोल्हे यांनी यावेळी केले आहे.

VIDEO:युतीचं फायनल झालं की नाही? चंद्रकांत पाटील म्हणतात...

Published by: Sandip Parolekar
First published: September 21, 2019, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading