शरद पवारांची मोठी घोषणा, बीडमधील 5 उमेदवारांची नावं जाहीर

बीडमध्ये आज शरद पवार यांनी मोठी घोषणा करत राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची नावंही जाहीर केली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 02:28 PM IST

शरद पवारांची मोठी घोषणा, बीडमधील 5 उमेदवारांची नावं जाहीर

बीड, 18 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पडझड रोखून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची गोळाबेरीज करण्यासाठी शरद पवार हे स्वत: मैदानात उतरले आहेत. बीडमध्ये आज शरद पवार यांनी मोठी घोषणा करत राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची नावंही जाहीर केली आहेत.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. मात्र आता या जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे बीडमध्ये शरद पवार यांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. तसंच परळीमध्ये पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगणार आहे. कारण राष्ट्रवादीकडून भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत.

कोणत्या मतदारसंघातून राष्ट्रवादीने कुणाला दिली उमेदवारी?

परळी - धनंजय मुंडे

बीड- संदीप क्षीरसागर

Loading...

माजलगाव - प्रकाश सोळके

गेवराई - विजयसिंह पंडित

केज - नमिता मुंदडा

शरद पवार यांनी निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा केल्याने जिल्ह्यातील राजकारण मोठे चुरशीचे होणार आहे. राष्ट्रवादीच्या या खेळीला आता भाजप कसे उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या महाजनादेश यात्रेच्या माध्यामातून पुन्हा एकदा भाजपला सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजपच्या या रणनीतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर पवारांचा राज्याचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झालं आहे. ही  शरद पवार हे सध्या राज्याच्या दौरा करत आहेत. या दौऱ्यावेळीच पवार यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांबद्दल भाष्य केलं आहे.

'तुम्ही ताकद देऊन मोठे केलेले नेते आता पक्ष सोडून जात आहेत. याचा तुम्हाला त्रास होतो का?' असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, 'या नेत्यांनी पक्ष सोडल्याने मला अजितबात त्रास होत नाही किंवा वाईट वाटत नाही. उलट पक्ष सोडताना या नेत्यांनी दिलेल्या कारणांवर मला हसू येतं.'

'लोकांकडून मिळते उर्जा'

एकीकडे दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला असताना शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. 'मी जर घरात असेल तर मला अस्वस्थ व्हायला होतं. पण लोकांना भेटल्यावर मला बरं वाटतं. त्यांच्याकडून मला मोठी उर्जा मिळते,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 02:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...