विनायक मेटेंना आणखी एक धक्का.. एकुलता एक जिप सदस्यही भाजपने पळवला

महाजनादेश यात्रेतील मुंडें-मेटे वादाच्या महानाट्यानंतर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना आणखी एक धक्का दिला आहे.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 06:07 PM IST

विनायक मेटेंना आणखी एक धक्का.. एकुलता एक जिप सदस्यही भाजपने पळवला

बीड, 5 सप्टेंबर: महाजनादेश यात्रेतील मुंडें-मेटे वादाच्या महानाट्यानंतर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना आणखी एक धक्का दिला आहे. शिवसंग्रामच्या तिकिटावर निवडून आलेले नेकनूरचे जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे बीड जिल्हा परिषदेत शिवसंग्रामची सदस्य संख्या आता शुन्य झाली आहे. चार सदस्य निवडून आणून देखील शिवसंग्रामला हे सदस्य टिकवता आले नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर महाजनादेश यात्रेमधील वचपा काढत पंकजा मुंडेंनी 'जादूची कांडी' पुन्हा एकदा आमदार मेटेंवर भारी ठरली आहे.

पंकजा मुंडेंना धक्का देणाऱ्या विनायक मेटेंच्या शिवसंग्रामलाच त्यांच्या पक्षातील सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनीच सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसंग्रामचे चार सदस्य निवडून आले होते. यामुळे भाजपने युती करत शिवसंग्रामकडे जि.प.चे उपाध्यक्षपद दिले होते. मात्र यापूर्वीच शिवसंग्रामचे तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के यांचे पती राजेंद्र मस्के यांनी शिवसंग्रामला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मस्केंच्या भाजपशी जवळीक साधण्याच्या निर्णयानंतर आमदार मेटेंनी जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढण्याची घोषणा केली होती. तसेच राज्यांत युतीसोबत पण बीडमध्ये नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी मात्र लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसंग्रामचे अशोक लोढा आणि विजयकांत मुंडे या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी देखील भाजपत प्रवेश केला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसंग्रामचे एकमेव भारत काळे यांनीही भाजपात प्रवेश केल्याने जिल्हा परिषदेत शिवसंग्रामची सदस्य संख्या शुन्यावर आली आहे.

VIDEO: शिल्पा शेट्टीच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन, ढोल-ताशाच्या तालावर धरला ठेका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 06:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...