• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • कोल्हापूर कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदी लागली अखेर यांची वर्णी, या नेत्यांनी लावली होती 'फिल्डिंग'

कोल्हापूर कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदी लागली अखेर यांची वर्णी, या नेत्यांनी लावली होती 'फिल्डिंग'

कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी अखेर आमदार सतेज पाटील यांची वर्णी लागली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सतेज पाटील यांची निवड केल्याचे पत्र शनिवारी दिले आहे.

 • Share this:
  कोल्हापूर, 7 सप्टेंबर: कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी अखेर आमदार सतेज पाटील यांची वर्णी लागली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सतेज पाटील यांची निवड केल्याचे पत्र शनिवारी दिले आहे. दरम्यान, कधीकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला कोल्हापूर जिल्हा भाजप-शिवसेना युतीने काबीज केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष ऐकही आमदार जिल्ह्यातून निवडून आणू शकला नाही. ऐन विधानसभा निवडणूक येऊन ठेपली असतानाच माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष पद रिक्त झाले होते. या नेत्यांनी लावली होती फिल्डिंग.. कोल्हापूर कॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी माजी खासदार जयवंतराव आवळे व गुलाबराव घोरपडे यांनी फिल्डिंग लावली होती. पण मरणासन्न अवस्थेत गेलेल्या कॉंग्रेसची जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी तसेच अंतर्गत गटबाजी तसेच शिवसेना व भाजपचा विजयाचा मेरू रोखण्याचे कडवे आव्हान आमदार सतेज पाटील यांच्या समोर असणार आहे. सतेज पाटील यांची निवडणुकीतून माघार माजी गृहराज्यमंत्री व काँग्रेसचे विधानपरिषदेचे सदस्य सतेज पाटील यांनी कोल्हापूर शहर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या विरोधात प्रज्ञा ऋतुराज पाटील हे काँग्रेसतर्फे उमेदवार असतील, अशी घोषणा गुरुवारी कार्यकर्ता मेळाव्यात केली. काँग्रेस आमदार सतेज पाटील गटाच्‍या कार्यकर्त्यांच्‍या बैठकीस शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक उपस्‍थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नुकत्याच झालेल्या कोल्हापूर दौर्‍यावेळी विधानपरिषद आमदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा काँग्रेस पक्षात विचार सुरू असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे आगामी विधासभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली. यानंतर जिल्ह्यातील दक्षिण विधासभा मतदारसंघातून पुन्हा पाटील-महाडिक यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. लाडक्या रॅम्बोला भेटायला पोहोचले राज ठाकरे, पाहा हा VIDEO
  Published by:Sandip Parolekar
  First published: