देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या घडामोडी

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या घडामोडी

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर : मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता-सुटता नसताना आता तब्बल 30 मिनिटांमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. दरम्यान, आज सकाळपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सेना- भाजपमधला तिढा सुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेसाठी केवळ एक दिवसांचा कालावधी उरला असताना राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द केला आहे.निवडणूका होऊन 15 दिवस झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षांनी दावा न केल्यामुळं मोठ्या घडामोडी घडत आहेत. सत्तास्थापनेसाठीची मुदत उद्या, 9 नोव्हेंबरला संपतेय. त्यामुळेच सरकार स्थापन करण्याच्या घटनांना वेग आला आहे.

30 मिनिटांत घडलेल्या राजकीय घडामोडी

1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळं आता 4.30 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

2.सत्ता स्थापनेसाठी एकीकडे मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी मसुदा तयार करण्यात येणार आहे. यातच मुख्यमंत्री 4.30 वाजता पत्रकार परिषेद घेणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांन यु-टर्न घेतलेल्या वक्तव्यावर ते चर्चा करतील, असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

3.दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी शरद-पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत, राष्ट्रवादी कॉंग्रस विरोधी पत्र म्हणूनच काम करणार असे स्पष्ट केले होते. दरम्यान आता पुन्हा शरद पवारांच्या निवास्थानी संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली. त्यामुळं राऊत आणि पवार यांच्यात काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

3.याआधी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसोबत समसमान सत्तावाटपाबाबत काहीही ठरलं नव्हतं, असा दावा विधानसभा निवडणुकांबद्दल भाष्य करताना दिवाळी मिलनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर भाजपसोबत सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा करायची नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. त्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आपलं वक्तव्य मागे घेण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपकडून ड्राफ्टही तयार करण्यात येत असल्याची माहिती आहे.

4.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज सेनाभवनात एक महत्त्वाची बैठक घेतली. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. आम्हाला मुख्यमंत्रिपदाचं पत्र हवं आहे, मसुदा नको, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेना वाटाघाटींसाठी तयार होते का, सत्तास्थापनेची ही कोंडी फुटू शकते का याची उत्तरं मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल. उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता रंगशारदामध्ये शिवसेनेच्या आमदारांची भेट घेणार आहेत. त्या बैठकीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

5.शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच मुंबई पोलिसांना पत्र, '15 तारखेपर्यंत आमदारांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बर्निंग कारचा थरार; पाहा LIVE VIDEO

First published: November 8, 2019, 4:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading