महाराष्ट्रात आचारसंहिता लागू, सोशल मीडियावर येणार ही बंधनं

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू, सोशल मीडियावर येणार ही बंधनं

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या वेळी एक नवा नियम राजकीय पक्षांसाठी जारी केला होता. तो विधानसभा निवडणुकीतही लागू होणार आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांचा जाहिरनामा प्रत्यक्ष मतदानाच्या 48 तास आधी मांडता येणार नाही. मतदानापूर्वी काही तास अगोदर प्रचार थंडावतो.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही राज्यांत 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. यासोबतच आयोगानं 64 जागांवर पोटनिवडणुकांसाठीही सूचना जारी केल्या आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांसाठी प्लास्टिकच्या वापर टाळण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी प्लास्टिक वापरासंदर्भात विशेष निर्देश जारी केले आहेत. राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करावा, असं आवाहन सुनील अरोरा यांनी केलं आहे.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या वेळी एक नवा नियम राजकीय पक्षांसाठी जारी केला होता. तो विधानसभा निवडणुकीतही लागू होणार आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांचा जाहिरनामा प्रत्यक्ष मतदानाच्या 48 तास आधी मांडता येणार नाही. मतदानापूर्वी काही तास अगोदर प्रचार थंडावतो. मतदारांवर कुठल्याही प्रकारचा दबाव असू नये यासाठी हा नियम गेल्या काही निवडणुकांदरम्यान पाळण्यात येत आहे.

याच नियमाचा एक भाग म्हणून कुठल्याही टप्प्यात निवडणूक असली, तरी त्याच्या आधी 48 तास राजकीय पक्षांनी जाहीरनामे सादर करू नयेत, अशा अर्थाचं पत्र निवडणूक आयोगाने शनिवारी सगळ्या पक्षांना पाठवलं.

पूर्वीच्याच नियमाचा हा भाग आहे, हे स्पष्ट करत आयोगाने अशा प्रकारे आश्वासनं देणारे जाहीरनामे प्रचाराचा काळ संपल्यानंतर जाहीर करू नयेत, असं सांगितलं आहे. हा आचारसंहितेचाच एक भाग आहे.

आचारसंहिता लागू झाली म्हणजे आता सरकारी कामं बंद होणार, असा समज सर्वसामान्यांचा असतो. पण नक्की काय करण्यावर बंदी आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागेल.

आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ही 10 कामं सुरूच राहणार

1. पेंशनचं काम

2. आधारकार्ड बनवणं

3. जाती प्रमाण पत्र बनवणं

4. वीज आणि पाण्यासंबंधी काम

5. साफसफाई संबंधी काम

6. वैद्यकीय उपचारासंबंधी मदत घेणं

7. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम

8. सुरू असलेला प्रकल्पही थांबणार नाही

9. आचारसंहितेचं कारण पुढे करून अधिकारी तुमची ही कामं टाळू शकणार नाहीत

10. ज्या लोकांनी घराच्या आराखड्यासाठी आवेदन दिलंय, त्यांचे आराखडे पास होतील. पण नवीन आवेदनं स्वीकारली जाणार नाहीत.

इतर बातम्या - निवडणुकीच्या घोषणेनंतर कोल्हापुरात होणार मोठी कारवाई, 1500 समाजकंटक हिटलिस्टवर!

आचारसंहितेमुळे या गोष्टींवर बंदी

1. सार्वजनिक उद्घाटन, भूमिपूजन बंद

2. नव्या कामांचा स्वीकार बंद

3. सरकारी कामांचे होर्डिंग्ज लावले जाणार नाहीत

4. मतदार संघांत राजकीय दौरे नाहीत

5. सरकारी वाहनांना सायरन नाही

6. सरकारी कामकाजाचे होर्डिंग्ज काढून टाकले जातील

7. सरकारी भवनांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री राजकीय व्यक्ती यांचे फोटो चालणार नाहीत.

8. वर्तमानपत्र, इलेक्ट्राॅनिक आणि इतर मीडियात सरकारी जाहिराती देता येणार नाहीत

9. कुठल्याही लाचखोरीपासून स्वत:ला बाजूला ठेवा. घेऊ नका, देऊ नका.

10. सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी या गोष्टींचा विचार करा.

तुमची एक पोस्ट तुम्हाला तुरुंगात पोचवू शकते. म्हणून कुठलीही पोस्ट शेअर करण्याआधी आचारसंहितेचा विचार करा. हे नियम सर्वसाधारण व्यक्तींनाही लागू होणार. तुम्ही एखाद्या नेत्याचा प्रचार करत असाल, तरीही तुम्हाला आचारसंहितेचा भंग करता येणार नाही. तुरुंगवास होऊ शकतो.

निवडणुकांची घोषणा केल्यानंतर निवडणूक आयोग सोशल मीडियावर देखील लक्ष ठेवणार असून त्याच्या खर्चाचा तपशील देखील आता निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करताना उमेदवारांना देखील काळजी घ्यावी लागणार आहे.

VIDEO: विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 02:40 PM IST

ताज्या बातम्या