नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात या पक्षाच्या नेत्याने थोपटले दंड

नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात या पक्षाच्या नेत्याने थोपटले दंड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण पश्चिम हा हॉट मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध आहे. या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात लढायला कोणी तयार नाही.

  • Share this:

नागपूर,28 सप्टेंबर: विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच राज्यभरात प्रचाराचा धुराळा उठण्यास सुरूवात झाली आहे. राजकीय नेते आतापासूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा चिखलफेक करताना दिसत आहे. त्यात राज्याची उपराजधानीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. कारणही तसेच आहे. जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दक्षिण पश्चिम हा हॉट मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध आहे. या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात लढायला कोणी तयार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना वॉकओव्हर मिळेल, असे वक्तव्य सत्ताधारी भाजपचे नेते संदीप जोशी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. संदीप जोशी यांच्या वक्तव्य प्रशांत पवार यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले आहे.

मनसेकडून लढवली होती निवडणूक

सन 2004 मध्ये प्रशांत पवार यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम करत जय जवान जय किसान संघटनेची स्थापना केली. आता प्रशांत पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कंबर कसली आहे. काँग्रेसने उमेदवारी दिल्यास चांगलेच आहे. अन्यथा आपण स्वतंत्र लढणारच आहोत, असे पवार यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

एकनाथ खडसेंविरोधात लढणार 'हा' शिवसेना नेता

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी दंड थोपटले आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघ मिळवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. भाजप-शिवसेनेत युती झाली तरी आपण पक्षाचा राजीनामा देऊन खडसेंच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

यावरून खडसेंविषयी राग..

दरम्यान, 2014 मध्ये भाजप-शिवसेनेची युती तोडण्याचा निर्णय एकनाथ खडसेंनी जाहीर केला होता. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांत खडसेंविषयी प्रचंड राग आहे. त्यातच खडसे व पाटील यांच्यात राजकीय हाडवैर आहे. म्हणूनच 2014 मध्ये पाटील हे खडसेंविरोधात उभे होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाटील यांना मदत केली होती. तरी पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. यंदाही खडसेंविरुद्ध सर्वांनी एकत्रित सक्षम उमेदवार द्यावा, म्हणून पाटील प्रयत्नशील आहे. तसे झाल्यास भाजपचा एक गटही मदतीच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अजित पवारांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, पाहा हा VIDEO

First published: September 28, 2019, 10:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading