मोदींनी शेतकऱ्यांचे कोटी रुपये उद्योगपतींच्या खात्यात टाकले, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट!

नथुराम गोडसेंना मानणाऱ्यांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी भाजपावर केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 07:17 AM IST

मोदींनी शेतकऱ्यांचे कोटी रुपये उद्योगपतींच्या खात्यात टाकले, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट!

अमरावती, 16,ऑक्टोबर : भाजप आरएसएसचा राष्ट्रवाद मुसोलिनी, हिटलरच्या विचाराने प्रेरित दुटप्पी राष्ट्रवाद असून नथुराम गोडसेंना मानणाऱ्यांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी भाजपावर केली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या  काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या नांदगाव पेठ येथील प्रचार सभेत ते बोलत होते. मोदींच्या विरोधात बोलले तर देशद्रोही ठरवलं जातं. पुलवामा हल्ल्याची चौकशी का झाली नाही? दीडशे किलो आरडीक्स आलं कुठुन? 15 लाख देणार होते ते कुठं गेले? असं म्हणत मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी भाजपावर निशाना साधला.

पंतप्रधान मोदी कलम 370 वर बोलतात पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र बोलत नाहीत. भाजपच्या सरकारने निवडणूकीच्या वेळी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नसून सरकारने आरबीआय मधून 1 लाख 74 कोटी रुपये काढून उद्योगपतींच्या खात्यात टाकले. पण तेच पैसे शेतकऱ्यांना थेट दिले असते तर आर्थिक मंदी आली नसती असेही भुपेश बघेल म्हणाले.

देशाला बेरोजगारीच्या खाईत भाजप सरकारने टाकलं असून भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक मंदीच्या खाईत गेला आहे. देशात मंदीची लाट आहे पण छत्तीसगडमध्ये मंदी नाही असंही मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी म्हटलं आहे. या सभेत त्यांनी काँग्रेसला मत देऊन यशोमती ठाकूर यांना विजयी करा असं आश्वासन दिलं तर सत्ताधारी भाजपवर त्यांनी घणाघाती टीका केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील मंगळवारी झालेल्या सभेमध्ये भाजपवर जोरदार टीका केली.

'भारतरत्न' म्हणजे हे सरकारचं इलेक्शन गिमिक,सुप्रिया सुळेंची सरकारवर घणाघाती टीका

भारतरत्न' हे सरकारचं 'इलेक्शन गिमिक' असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. कल्याणमध्ये मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेनंतर सुप्रीया सुळे यांनी ही टीका केली. भाजपच्या संकल्पनाम्याची 'गाजरांचा पाऊस' म्हणूनही त्यांनी खिल्ली उडवली.

Loading...

भाजपनं आजच आपला संकल्पनामा जाहीर केला असून यात स्वातंत्रवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचं म्हटलंय. मात्र, प्रत्यक्षात आपण ही मागणी मागील 2 ते 3 वर्षांपासून लोकसभेत करत होते. त्यावेळीही यांचंच सरकार होतं, मग निवडणुका आल्यावरच यांना भारतरत्न का आठवला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. भाजपचा संकल्पनामा म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस असल्याची टीकाही त्यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेवरून सध्या सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचं सांगत भूतकाळ पुन्हा उकरून काढण्यापेक्षा वर्तमानात आपल्यापुढे काय समस्या आहेत? त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसंच महाराष्ट्रात जर तुमचं इतकं चांगलं काम असेल, आणि पैलवान तयार असतील, तर दिल्लीवरून मॉनिटर कशाला बोलवावे लागतात? असा सवाल उपस्थित करत सुप्रीया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 07:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...