शिवसेना प्रवेशबाबत काय म्हणाले छगन भुजबळ... या शहरात केले शक्तीप्रदर्शन

शिवसेना प्रवेशबाबत काय म्हणाले छगन भुजबळ... या शहरात केले शक्तीप्रदर्शन

छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी त्यांच्या शिवसेना प्रवेशबाबत चर्चा अद्याप थांबायला तयार नाही.

  • Share this:

बब्बू शेख,(प्रतिनिधी)

मनमाड,19 सप्टेंबर: 'मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि याच पक्षाकडूनच येवल्या विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे छगन भुजबळ यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष शक्तीप्रदर्शन करत आहे, असे मत भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबत व्यक्त केले आहे.

छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी त्यांच्या शिवसेना प्रवेशबाबत चर्चा अद्याप थांबायला तयार नाही. दरम्यान, भुजबळ येवल्यातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र,'मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि राष्ट्रवादी पक्षाकडूनच येवला मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे छगन भुजबळ यांनी मनमाडला 'News 18 लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले. विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार असून आपल्यासमोर कोणाचेही आव्हान नाही, जे आहे ते शून्य असल्याचे भुजबळ यांनी सांगून त्यांना आव्हान देणारे राष्ट्रवादीचे माणिकराव शिंदे यांना सडेतोड उत्तर दिले.

पुणेगाव कालव्यातून पाटाद्वारे येवल्याकडे पाणी सोडण्यात आले. पाटाचे दरवाजे उघडण्यासाठी छगन भुजबळ मनमाडजवळ दरसवाडी येथे आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आणि आज नाशिकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबत भाष्य केले. सध्या निवडणूक जवळ आल्याने सर्वच पक्ष शक्तीप्रदर्शन करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

VIDEO:ठेवीदार भडकले, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाला भररस्त्यावर बेदम चोपले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 09:49 PM IST

ताज्या बातम्या